पुणे

किरण गोसावीविरोधात पुण्यात तिसरा गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs case) मुख्य साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्या विरोधात आता पुण्यात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील वानवडी (Vanwadi) भागात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश माणिकराव वाघमारे असे फिर्यादी तरुणाचे नाव असून आरोपी किरण गोसावी याने प्रकाशकडून परदेशात नोकरी लावण्यासाठी एक लाख 53 हजार रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ ते २०२१ या काळातील घटना उघडकीस आली आहे. पुणे- सोलापूर रस्त्यावरील क्रोम मॉल चौक परिसरातील मित्रांना मलेशियात मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तक्रारदारांना त्यांनी ५५ हजार रुपये पगार मिळण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने त्यांच्यासोबत इतरांनाही याची माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता.

तसेच नोकरीची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी म्हणजे व्हीजा, हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या बहाण्याने गोसावीने तक्रारदाराकडून पहिल्यांदा ५५ हजार आणि त्यानंतर ९० हजार असे एकूण १ लाख ४५ हजार रुपये घेतले. त्यानंतर अनेकदा तक्रारदाराने अनेकदा विचारुनही गोसावीने टाळाटाळ केली आणि नोकरीही दिली नाही. त्यामुळे तक्रारदारने एकतर परदेशात जाण्याची व्यवस्था करावी किंवा पैसे परत करावेत, यासाठी ऑफिसात गेले असता गोसावीने पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांना धमकावले. धक्कादायक म्हणजे किरण गोसावीने पुण्यातील अनेक तरुणांना फसवल्याच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत.

यापुर्वीही आरोपी किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील क्रुझ पार्टीत आर्यन खानला अटक केल्यानंतर गोसावीने आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीमुळे गोसावी प्रकाश झोतात आला. त्यानंतर पुण्यासह राज्यभरात त्याच्याविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान दोन दिवसांपुर्वी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अमली एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT