Sharad Pawar on Devendra Fadanvis:  Sarkarnama
पुणे

Devendra Fadanvis -OBC Politics: फडणवीसांनी पुन्हा अज्ञान दाखवलं...: शरद पवार स्पष्टचं बोलले

Baramati Politics: राष्ट्रवादीत पदं देताना तिथे कधी ओबीसींचा विचार केला जात नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Criticized Devendra Fadanvis: राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) ला पक्षात फक्त चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी नेते हवे आहेत. राष्ट्रवादीत पदं देताना तिथे कधी ओबीसींचा विचार केला जात नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांना (Devendra Fadanvis) उत्तर दिलं आहे. "हे तर फडणवीसांचे अज्ञान आहे. राष्ट्रवादीचे पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष हे छगन भुजबळ हे होते. त्यांच्यानंतर पिचड होते. त्यानंतर सुनील तटकरे, हे सर्व कोण आहेत, एक-एक नाव जर दिली तर तुम्हाला कळेल. अर्थात त्यांचं वाचन किती आहे, ते मला माहिती नाही, या सगळ्या गोष्टींची नोंद न घेत ते विधानं करतात, ठिके.. पण लोकांना माहिती असतं. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवतेला धरून नाही.

अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादीतील जबाबदारी बदलणार का, बदलली तर त्यांना कोणती जबाबदारी मिळेल, याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, जबाबदारी कुणावर द्यावी. निर्णय एकटा कुणी घेत नसतो. त्यांच्यासह पक्षातील प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधी निर्णय घेतील. पक्ष संघटनेत आज सर्वांनी अधिक लक्ष द्यावं अशी सर्वांची इच्छा आहे. तेच मत त्यांनी त्याठिकाणी व्यक्त केलं. त्यापेक्षा वेगळं काही नाही.

काय म्हणाले होते फडणवीस?

बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम देशात आणि महाराष्ट्रात भाजपा करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सारख्या पक्षात त्यांना फक्त चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी नेते हवे आहेत. पदं देण्यासाठी नको आहेत. पदं देताना तिथे कधी ओबीसीचा विचार होत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. “सामान्य ओबीसी(OBC) घरातील मुलगा आज देशाचा पंतप्रधान म्हणून संपूर्ण विश्वात भारताचा तिरंगा फैलावत आहे. यापेक्षा मोठा ओबीसींचा सन्मान काय असू शकतो.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT