Maharashtra Politics:
Maharashtra Politics:  Sarkarnama
पुणे

Ajit pawar Latest news: जे माझ्यावर खुप प्रेम करतात तेच...; नाराजीच्या चर्चांवर अजित पवार स्पष्टचं बोलले...

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar spoke on the discussions of displeasure : ''ज्यांना माझी कामे बघवत नाहीत. जे माझ्यावर अतिशय प्रेम करतात तेच माझ्याबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार करत आहेत,'' अशी मिश्किल टिप्पण्णी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीच्या अफवा पसरवणाऱ्यांंवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. या चर्चांवर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. (Those who love me very much Ajit Pawar spoke clearly on the discussions of displeasure)

''आम्ही २५ जण त्या कमिटीत होतो.आम्ही पवार साहेबांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी आमच्यातील मोजक्या काही जणांनाच पत्रकार परिषदेत यायला सांगितलं. त्यात प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, केरळचे एक प्रतिनिधी होते. काही ठराविक लोकच तिथे हजर होते. पवार साहेबांनी आम्हाला येऊ नका असं सांगितलं. साहेबांचा आदेश शिरसावंद्य, म्हणून आम्ही आलो नाही.'' असं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलं.

''शरद पवार आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका घेतल्यानंतर आम्ही कुठलीही प्रतिक्रीया देत नाही. जी त्यांची भूमिका तीच पक्षाची भूमिका आहे. आता राजीनाम्याचा विषय संपला आहे. पवार साहेबांना जे सागांयचं होतं ते त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. काल पवार साहेब बारामतीतही तुमच्याशी बोलले. त्यामुळे जे साहेबांचं मत ते आमच्या सगळ्यांच मत,'' असंही अजित पवार यांनी सांगितलं.

''आमची महाविकास आघाडी होती. ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहिल.आमची सर्वांची काम चालली आहेत. कालही साहेबांनी साहेबांनीच सांगितलं की अजित पवार कामाचा माणूस आहे. जेव्हा तुम्ही उठलेले नसता तेव्हा माझं काम सुरु झालेलं असतं. राजीनाम्याबाबत जे काही घडलं ते मिडीयाने दाखवलं. आम्ही सर्वजणांनी मिटींग घेतली. त्यानंतर शरद पवार साहेबांना भेटलो. जो ठराव केला तोही दिला. त्यावर साहेबांनी कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या शब्दाला मान देऊन निर्णय मागे घेतला.''

''पण तुम्हाला वाटलं अजित पवार नाराज आहेत. या सर्व घडामोडी घडल्यानंतर माझीही काही काम होती. मी पुण्यात आलो. तुम्ही सांगितलं दादा दिल्लीला गेले, त्यानंतर माझ्या दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकांऱ्यासोबत बैठका ठरलेल्या होत्या, त्या घेतल्या. त्यानंतर मी कर्जत ला गेलो. अजूनही बारामतीत आहे. उद्या साताऱ्याला जाणार तिथेही माझे कार्यक्रम आहेत. संध्याकाळी रयत शिक्षण संस्थेची मिटींग आहे. त्यानंतर मी फलटणला जाणार आहे.'' असा पुढच्या दोन-तीन दिवसांचा दौराही त्यांनी यावेळी जाहीर केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT