Aditya Thackeray Criticized CM Shinde: 50 खोकेवाले 40 टक्केवाल्यांच्या प्रचाराला...; आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचलं...

Karnatak Elections 2023| कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे हे देखील कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत.
Aditya Thackeray Criticized CM Shinde:
Aditya Thackeray Criticized CM Shinde: Sarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray Cririticized Eknath Shinde : कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Aditya Thackeray criticized Eknath Shinde who campaigned for the Karnataka elections)

Aditya Thackeray Criticized CM Shinde:
Pawar On Pandharpur Ncp Candidate : अभिजित पाटील पंढरपूरचे २०२४ चे राष्ट्रवादीचे उमेदवार : शरद पवारांचे स्पष्ट संकेत

ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा ५० खोक्यांवरुन शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.''५० खोकेवाले गेलेत ४०% वाल्या सरकारचा प्रचार करायला! इथे महाराष्ट्रात ४०% काय, अख्खं सरकारच बिल्डर- कॉंट्रॅक्टर चालवतात!'' असं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी ते कर्नाटकमध्ये गेल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

दरम्यान, माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते के.एस. ईश्वरप्पा यांच्यावर सरकारी प्रकल्पांसाठी ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करणारे बेळगाव येथील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूनंतर एप्रिल २०२२ मध्ये ‘४० टक्के कमिशन’चा वाद सुरू झाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर सरकारवर ४० टक्के कमीशनचा मुद्दा उचलून धरला. कंत्राटदारांच्या संघटनेने विविध शासकीय विभागांमध्ये भ्रष्टाचार आणि राज्य सरकारकडून बिले न भरल्याचा आरोप करत जोरदार निदर्शने केली.

तेव्हापासून कर्नाटकमध्ये ४० टक्के कमीशचा मुद्दा चांगलाच तापला आहे. तर महाराष्ट्रातही सत्तांतरासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना ५० कोटी रुपये दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावर निशाणा साधत ५० खोकेवाले ४०% वाल्या सरकारचा प्रचार करायला गेल्याची टीका केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com