Corona Sarkarnama
पुणे

आज पुण्यात कोरोनाचे केवळ ११२ नवे रूग्ण

साथीच्या गेल्या दीड वर्षाच्या काळात पहिल्यांदाच पुणे शहरातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या एक हजाराखाली आली आहे.

उमेश घोंगडे

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. आज दिवसभरात शहरात ११२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.दिवसभरात ११९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात ही संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

शहरातील विविध रूग्णालयात १५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या ९९४ इतकी आहे.गेल्या दीड वर्षात आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या पाच लाख तीन हजार ३५७ इतकी आहे. यामधील चार लाख ९३ हजार २९६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

साथीच्या गेल्या दीड वर्षाच्या काळात पहिल्यांदाच पुणे शहरातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या एक हजाराखाली आली आहे.दरम्यान,शहरातील कोरोना संसर्गाचा दर सलग तीन आठवड्यांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी नोंदला जात आहे.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी ९ मार्चला पुण्यात आढळला. त्यानंतर एकापाठोपाठ एक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अवघ्या एका महिन्यात कोरोनाबाधीतांचा आकडा २०० पर्यंत वाढला होता. देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण पुण्यात होते. शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ सप्टेंबरला एका दिवशी सर्वाधिक म्हणजे दोन हजार १२० रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद महापालिकेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने कमी होत गेली.

यंदा २५ जानेवारीला कोरोनाचे ९८ रुग्ण होते. ही पहिल्या लाटेतील एका दिवसातील सर्वांत कमी रुग्णसंख्या ठरली. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढू लागला. ही शहरातील दुसऱ्या लाटेची सुरवात असल्याचे आता दिसते. शहरात यंदा ९ मार्चपर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या एक हजार ८६ पर्यंत वाढली होती. अवघ्या महिन्यात म्हणजे ८ एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या सुमारे साडेसहा पटीने वाढली. त्यामुळे ८ एप्रिल या एकाच दिवशी सात हजार १० रुग्ण नव्याने आढळले होते. ही शहरातील दुसऱ्या लाटेतील एका दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या ठरली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT