National flag of India
National flag of India Sarkarnama
पुणे

पिंपरीत हजारो अनधिकृत घरांवर फडकणार तिरंगा; राष्ट्रध्वज अवमानाच्या घटना वाढण्याची भीती

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळच्या स्वातंत्र्यदिनी देशभरात `हर घर तिरंगा` मोहीम राबविली जाणार आहे.त्यातून पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) पावणेदोन लाख अनधिकृत घरांपैकी बहूतांश ठिकाणी तो फडकावला जाण्याची शक्यता आहे. तर, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर झेंडावदन होत असल्याने त्याच्या अवमानाच्या घटनाही तेवढ्याच संख्येने होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण जेवढ्या जोरात घर घर तिरंगा मोहीमेची तयारी सुरु आहे, मात्र, तो कसा फडकावयचा व त्याचा अवमान कसा होणार नाही याच्या जागृतीकडे सरकार आणि प्रशासनाकडून तेवढे लक्ष देण्यात आलेले नाही. (National flag of India)

लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात (रेड झोन) मोडणाऱ्या देशाच्या १३ राज्यातील काही कोटी अनधिकृत घरांवर तिरंगा फडकला जाणार असल्याच्या मुद्याकडेही शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच सूप वाजलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधले होते. असे दोन रेड झोन असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये पाच लाख रहिवासी राहत आहेत. तेथे अदमासे लाखभर बेकायदेशीर घरे आहेत. त्यासह शहरात पावणेदोन लाख अनधिकृत घरे आहेत. त्यातील बहूतांश ठिकाणी येत्या शनिवारपासून (ता.१३ ऑगस्ट) घर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा तीन दिवस म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत फडकावला जाणार आहे.

दरम्यान, तिरंगा फडकावण्याचे काही नियम आहेत. दरवेळी फक्त सुती कापडात आतापर्यंत तो फडकावला जात होता. मात्र, यावेळी तो सर्व प्रकारच्या कापडात फडकावण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सुर्यास्तानंतर तो व्यवस्थित सन्मानाने उतरविण्याचाही नियम आहे. तसेच तीन रंगापैकी केशरी हा रंग वरील बाजूस राहील,याचीही दक्षता घ्यायची असते. अन्यथा त्याचा अवमान होण्याची भीती आहे. राष्ट्रध्वजापेक्षा इतर झेंडे हे तो फडकावलेल्या जागी उंच नसले पाहिजेत. तसेच तो चुरगळलेला व मळलेला नसावा. हे पाळणे आव्हानात्मक असणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन लाख, तर देशात तीस कोटी घरावर यावेळी १५ ऑगस्टला तिरंगा डौलात फडकणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टनंतर एवढ्या मोठ्या संख्येतील तिरंग्यांचा अवमान आणि गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने जनजागृती होणे नितांत आवश्यक होते. पण, पिंपरी-चिंचवडमध्येच नाही, तर इतरत्रही ती राज्य सरकारकडून झालेली दिसून आलेली नाही. त्यामुळे अजानतेपणी का होईना यावेळी मोठ्या प्रमाणावरील झेंडावंदनातून तिरंग्याचा अवमान, तर होणार नाही, ना ही भीती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT