ajit pawars facebook account hacked sarkarnama
पुणे

Shivajirao Garje : अजित पवारांचे फेसबुक पेज हॅक? आमदार शिवाजीराव गर्जेंनी दिली खरी माहिती

Shivajirao Garje ajit pawars facebook account hacked : अजित पवार यांच्या फेसबुक पेज हॅक झाल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र या प्रकरणी महत्त्वाची माहिती आमदार शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेज हॅक झाल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, राष्ट्रवादीचे फेसबुक पेज हॅक झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात करत स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.

'उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे', असे गर्जे म्हणाले.

'दीड महिन्यापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. तसेच 'लाडकी बहीण योजने'सह महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जनसन्मान यात्रेला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही जणांना पोटशुळ उठला असून ते जाणीवपूर्वक अजितदादा पवार यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत.' असे देखील गर्जे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून ते समाज माध्यमांमधून फिरवण्यात येत आहेत. तसेच या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित होते असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT