BJP Politics Video : मोठी बातमी! भाजप 160 जागा लढणार, एकनाथ शिंदे, अजित पवारांचे काय?

BJP Contesting 160 Seats Maharashtra Elections : गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजप नेते आणि पदाधिकऱ्यांनी अमित शाह यांच्याकडे भाजपने 160 जागांवर लढले पाहिजे अशी मागणी केली.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

BJP Election Strategy : विधानसभेसाठी महायुतीमध्ये जागा वाटप अजून झाले नाही. शिंदे गटाकडून 120 जागांवर तर अजित पवार गटाकडून 80 जागांवर दावा सांगण्यात येत होता.

मात्र, भाजपने 160 जागांवर लढण्याचे निश्चित केले असून ते 160 जागांवर लढणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भाजप 160 जागांवर लढणार असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या वाट्याला प्रत्येकी 64 जागा येण्याची शक्यता आहे.

लोकसभेला भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विधानसभेला भाजप सावध पावले टाकत उतरला आहे. जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी भाजपने 160 पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

BJP
Shivsena Politics: बडगुजर प्रकरणात अंबडचे पोलीसच अडकले संशयाच्या भोवऱ्यात?

गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजप नेते आणि पदाधिकऱ्यांनी अमित शाह यांच्याकडे भाजपने 160 जागांवर लढले पाहिजे अशी मागणी केली होती.

लोकसभेत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त होता. त्यामुळे शिंदे गटाकडून 120 जागांवर दावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याला जागा जास्त असे सांगितले होते.

मित्रपक्षांना सोबत ठेवा

अमित शाह यांच्यानंतर भाजप अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हे देखील मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांनी महायुतीमधील पक्षांनी एकमेकांवर जाहीर नाराजी व्यक्त करू करू नका अशी सूचना केली होती. तसेच नड्डा यांनी निवडणुकीत मित्रपक्षांना सोबत ठेवा, असे भाजप नेत्यांना सांगितले होते.

BJP
Satyajeet Kadam : सत्यजित कदमांची वेगळी चूल? विसर्जन मिरवणुकीत दिसली भाजपमधील दुफळी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com