Trupti Desai Sarkarnama
पुणे

Trupti Desai On Dhananjay Munde : तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंना फटकारलं; म्हणाल्या, मुले चालतात,पत्नी का नाही?

Karuna Munde And Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा पूर्वीच पापाचा खडा भरला असून आता तरी त्यांनी अशाप्रकारे फसवणूक करू नये. स्वतःची आमदारकी जाण्याची मुंडे यांना भीती वाटत असल्याने....

Sudesh Mitkar

Pune News : मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे सत्र न्यायालयाने दिले होते. मात्र, या आदेशा विरोध धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे माझगाव सत्र न्यायालयात गेले होते. तर करुणा शर्मा मुंडे यांनी दोन लाख ही खूप कमी रक्कम असून 9 लाखांची पोटगी देण्यात यावी, अशी मागणी केली होतो. याबाबत शनिवारी (ता.29) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचे सांगितले. यावेळी न्यायाधीशांनी मग धनंजय मुंडे-करुणा शर्मा यांच्या मुलांचे आई वडील कोण आहेत? असा प्रति सवाल केला. त्यावर मुंडेंच्या वकिलाने धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांच्या आईशी अधिकृत विवाह केला नसल्याचा स्पष्ट केलं.

या सुनावणीनंतर याबाबत विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. मात्र, आता धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे की मुलं माझी आहेत. पण करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाहीत. धनंजय मुंडे नाकारत असले तरी करुणा मुंडे याच त्यांच्या पहिल्या पत्नी असून ती मुलं देखील त्यांचीच आहे.

धनंजय मुंडे हे मुलांचा स्वीकार करत आहेत. मात्र, त्या मुलांना जिने जन्म दिलेली त्या आईला स्वीकारत नाही. जिने तुम्हाला अनेक वर्ष साथ दिली. त्या महिलेला मात्र धनंजय मुंडे रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला

धनंजय मुंडे यांचा पूर्वीच पापाचा खडा भरला असून आता तरी त्यांनी अशाप्रकारे फसवणूक करू नये. स्वतःची आमदारकी जाण्याची धनंजय मुंडे यांना भीती वाटत असल्याने मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं ते खोटं जनतेला सांगत आहेत. करुणा मुंडे यांचा स्वीकार धनंजय मुंडे यांनी पहिली पत्नी म्हणून मोठ्या मनाने करणे आवश्यक असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT