Karuna Munde: करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, त्यांनी मला सोडलं नाही, तर...

Dhananjay Munde Vs Karuna Munde : शनिवारीच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना करुणा शर्मा यांच्याशी धनंजय यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचे म्हटलं. त्यावेळी न्यायाधीशांनी मग धनंजय मुंडे करुणा शर्मा यांच्या मुलांचे आई वडील कोण आहेत? असा प्रतिसवाल केला होता.
Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Dhananjay Munde And Karuna Munde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Karuna Munde News : वांद्रे सत्र न्यायालयाने माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र,या आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तर,दोन लाख ही खूप कमी रक्कम असून 9 लाखांची पोटगी देण्यात यावी, अशी मागणी करुणा यांच्याकडून करण्यात आली होती. याविषयी शनिवारी (ता.29) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याचदरम्यान,आता करुणा शर्मा मुंडे (Karuna Sharma Munde ) यांनी धनंजय मुंडेंच्या नात्यावर मोठं विधान केलं आहे.

करुणा शर्मा मुंडे या साम वृत्तवाहिनीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या विशेष कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर आपल्या भूमिका मांडल्या.यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताना, माझ्या नवऱ्यानं मला सोडलं नाही.तर आजूबाजूला काही ठराविक मंडळी होती. त्यांच्यामुळं आमचं नातं तुटलं.आमचं नातं तुटल्यावर त्यांना जास्त आनंद झाल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.

मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्रात जितके मंत्री आहेत,आमदार आहेत,खासदार आहेत,युवा नेते,कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही शिकण्यासारखी गोष्ट आहे असल्याचंही विधान शर्मा यांनी यावेळी केलं. हे सांगतानाच त्यांनी अश्रू अनावर झाले. खुलं आव्हानही दिलं. यावेळी त्यांनी आपण आपलं घर आणि आईचे दागिने विकून धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) 15 लाख रुपये दिल्याचा गंभीर आरोपही केला.

Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Atul Londhe : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंच्या अडचणी वाढणार?; भाजपच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

शनिवारीच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना करुणा शर्मा यांच्याशी धनंजय यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचे म्हटलं. त्यावेळी न्यायाधीशांनी मग धनंजय मुंडे-करुणा शर्मा यांच्या मुलांचे आई वडील कोण आहेत? असा प्रतिसवाल केला होता. त्यावर मुंडेंच्या वकिलानं धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे. मात्र, त्यांच्या आईशी अधिकृत विवाह केला नाही,असेही सांगितले.

करुणा शर्मा यांनी या मुलाखतीत जेव्हा मी अब्रू नुकसानीचा दावा केला, तेव्हा मला 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं सांगण्यासाठी मला 50 कोटींची ऑफर दिली होती. 18 कोटी कोर्टाच्यासमोर देणार आणि बाकीची रक्कम बाहेर देण्याचंही ठरलं होतं,असंही करुणा शर्मा यांनी यावेळी सांगितलं होतं.

Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Devendra Fadnavis : तुळजापुरात पाऊल ठेवताच सीएम फडणवीसांनी केली मोठी घोषणा; म्हणाले,'येत्या दोन वर्षातच...'

मुंडे म्हणाल्या,धनंजय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम होतं.ते पुण्यातील कॉलेजमधून मला भेटण्यासाठी इंदोरला येत होते. आठवड्यातून दोनवेळा ते गाडीनं मला भेटायला यायचे.मी पण इंदोरवरून पुण्याला ये-जा करत होते. लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या कुटुंबाला तीन ते चारवेळा भेटली आहे. तुमच्या आई-वडिलांकडे घेऊन जा, असं मी त्यांना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी माझे आई-वडील नाहीत, असं खोटंही त्यावेळी सांगितल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

करुणा शर्मा-मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे एक दिवस आले आणि म्हणाले,माझ्या हृदयामध्ये छिद्र आहेत. त्याचं मला ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी 40 लाखांचा खर्च आहे.त्यावेळेस मी त्यांना माझं एक घर जे माझ्या आई वडिलांनी माझ्या नावावर केलं होतं. त्याची किंमत त्यावेळी जवळपास 12 लाख रुपये होती.पण ते अवघ्या 9 लाखांना विकले.

Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Kolhapur Police : पोलिसांमध्ये पायताणाची मोठी दहशत; कोरटकरमुळे कोल्हापुरकरांवर आली अनवाणी फिरण्याची वेळ

तसेच माझ्या आईचे जे काही दागिने होते,ते विकत घेऊन ते विकत असे एकूण 15 लाख रुपये त्यांना दिले. ही गोष्ट जी आहे ती 2001 मध्ये घडली होती. पण सगळ्या गोष्टी ह्या आता समोर आल्या आहेत. सगळं खरं-खोटं हे 2021 मध्ये समोर आलं. असं कुठलंही ऑपरेशन त्यावेळी झालं नव्हतं. मला त्यावेळी खोटं सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com