Trupti Desai Sarkarnama
पुणे

Trupti Desai: धनूभाऊ, कार्यकर्त्यांना आवरा, नाहीतर परळीत येऊन...; तृप्ती देसाई संतापल्या

Trupti Desai Vs Dhananjay Munde : तृप्ती देसाई यांनी दोन दिवसापूर्वी माध्यमांसमोर येत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधाबाबत टिप्पणी केली होती. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे.

Sudesh Mitkar

Pune 20 Jan 2025 : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काही दिवसापूर्वीच माध्यमांसमोर येत मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड याच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर तृप्ती देसाई यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे देसाई त्रस्त झाले असून त्यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण तापलं आहे. या हत्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकामेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत.

दुसरीकडे सोशल मीडियावर दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद रंगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेत्यांच्या येणारा प्रतिक्रिया यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आणि प्रतिक्रियांचा महापूर येताना पाहायला मिळत आहे. या माध्यमातून नेत्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

तृप्ती देसाई यांनी दोन दिवसापूर्वी माध्यमांसमोर येत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधाबाबत टिप्पणी केली होती. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे आवश्यक आहे, असे देखील विधान त्यांनी केलं होतं.

वाल्मिक कराड हा 15 आणि 16 डिसेंबर रोजी नाशिक मधील एका मठामध्ये वास्तव्यास होता. त्या ठिकाणी त्याला लपण्यासाठी जागा दिली असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यामुळे या मठाच्या प्रमुखांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली होती.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असताना देखील मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली.

तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेनंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, "धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, मी अजून फार काही बोललेले नाही. परंतु सातत्याने खालच्या पातळीवर ट्रोलिंग केली तर परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने धडा शिकवीन असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT