Beed Guardian Minister: अजितदादा की धनुदादा...; पडद्यामागचे पालकमंत्री कोण?

Who is the Behind Scenes Guardian Minister of Beed: शिंदे सरकारमध्ये मुंडे हे पालकमंत्री असताना संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड हाच पडद्यामागचा पालकमंत्री होता, अशी चर्चा होती.
Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar and Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News 20 Jan 2025: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण गाजत असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रिपदापासून महायुती सरकारनं वंचित ठेवलं आहे. शिंदे सरकारमध्ये मुंडे हे पालकमंत्री असताना संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड हाच पडद्यामागचा पालकमंत्री होता, अशी चर्चा होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून बीडच्या पालकमंत्र्यांवरुन भाष्य केले आहे. "मुंडे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा ते नामधारी होते आणि त्या पदाची सूत्रे संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराड हलवायचा, असे उघडपणे बोलले जाते.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Prakash Abitkar: पहिल्यांदाच मंत्री अन् पालकमंत्रिपद मिळालं, आबिटकर यांच्यासमोर आता 'हे' मोठ आव्हान

आता बीडसाठी मुख्यमंत्र्यांनी काढलेला मधला मार्ग तशीच धूळफेक ठरणार नाही याची काय खात्री? पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा असेच होणार असेल तर या पापाचे प्रायश्चित्त सत्ताधाऱयांना जनताच देईल," असे अग्रलेखात नमूद केले आहे.

बीडमध्ये सध्या असणारं तणावाचं वातावरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या एकंदर परिस्थितीचा आढावा घेत येथील पालकमंत्रिपदाची धुरा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली.

पुणे आणि बीड अशा दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालं. पण, प्रत्यक्षात जनमतामुळं घेण्यात आलेला हा निर्णय पडद्यामागचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याच पारड्यात पडू नये, अशी अपेक्षा ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे प्रचंड टीका होत असलेल्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले नसले तरी हा निर्णय राज्यकर्त्यांनी मनापासून घेतलेला नाही. जनमताचा प्रचंड रेटा आणि राजकीय मजबुरी यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Guardian Minister Post: दोन मंत्री ठरले औटघटकेचे पालकमंत्री; मध्यरात्री महायुतीत खलबत; नेमकं काय घडलं?

आता त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. ते पुण्यासह बीडची जबाबदारीही सांभाळतील, मात्र ‘पडद्यामाग’चे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत, असे होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.

23 नोव्हेंबर 2024 रोजी सत्तेत आलेल्या सरकारचे पालकमंत्री जिह्यांना मिळायला 18 जानेवारी 2025 हा दिवस उजाडावा लागला. त्यातही ‘सह’ नेमून काही पालकमंत्र्यांचा ‘पाय’ मोडका करण्यात आला आहे.

‘नकोशा’ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याचे दुःख काहींच्या वाटय़ाला आले आहे तर ज्यांना या पदाने ठेंगा दाखविला त्यांना आदळआपट करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com