Pune News, 02 Apr : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक सहन करावा लागला आहे. त्यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे निधन झाले आहे.
निवडणूक कर्तव्यावर असतानाच आईच्या निधनाची बातमी समजताच तुकाराम मुंढे यांनी तातडीने पुण्याकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. ते आज रात्री ९ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचतील, अशी माहिती समोर आली आहे.
आईच्या अंत्यविधीसाठी मुंढे कुटुंबियांनी तयारी सुरू केली आहे. आज रात्री ९ वाजता पुण्याहून आसराबाई मुंडे यांचे पार्थिव बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना गावी नेण्यात येणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी गावातच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तुकाराम मुंढे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आईचे निधन झाल्याने प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आसराबाई मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आहे.
निवडणूक कर्तव्य सोडून तातडीने पुण्याला येण्याचा निर्णय घेतल्याने मुंडे यांचे कर्तव्यदक्ष व भावनिक संवेदनशील स्वभाव अधोरेखित झाला आहे. ताडसोन्ना गावात उद्या सकाळी होणाऱ्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि ग्रामस्थ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.