Tukaram Supe 

 
पुणे

TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सुपेंच्या ड्रायव्हरलाही अटक

TET परीक्षा घोटाळा तपासात तुकाराम सुपेंचा ड्रायव्हरचा कारनामा समोर आला आहे

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिक्षक परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी निलंबित आयुक्त तुकाराम सुपे ((Tukaram Supe) यांच्या नंतर आता त्यांच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आहे. सुनील घोलप (Sunil Gholap) असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंच्या (Tukaram Supe) ड्रायव्हरचे नाव आहे. सायबर पोलिसांनी घोलपसह मनोज डोंगरे (Manoj Dongare) यालाही ताब्यात घेतले आहे.

सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील घोलप तुकाराम सुपे यांनी पाठलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकीटे इतर आरोपींना पाठवत असे. घोलपने 2020 मधील टीईटी परीक्षांमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी इतर आरोपींशी संगनमत करून विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत.

तुकाराम सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अपवर पाठवत होता, आता घोलपच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉटसअॅप चॅटिंग बाबत पुरावा मिळवायचा आहे. तर पोलिसांनी सुनील घोलपला अटक केल्याने तुकाराम सुपेंचा आणखी कारनामा उघड होण्याची शक्यता आहे. तर मनोज डोंगरे हा तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक अजय सावरीकर यांच्या संपर्कात असल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली.

या प्रकरणात मनोज डोंगरेला तीन लाख 25 हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. तर न्यायालयाने घोलप आणि डोंगरे यांना ३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांची पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT