तुकाराम सुपेला आत्महत्या करावीशी वाटतेय

पुणे पोलिसांना (Pune Police) माहिती दिली तशी चौकशी व्हायला हवी, अशी मागणी तुकाराम सुपेकडून (Tukaram Supe) करण्यात आली आहे.
Tukaram Supe

Tukaram Supe

Sarkarnama

पुणे : शिक्षक पात्रता परिक्षा टीईटी (TET Paper Leak ) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपेंकडून (Tukaram Supe) काही खळबळजणक खुलासे केले जात आहेत. याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवले जात असून जाणूनबुजून टार्गेट केले जात असल्याने मनःस्ताप होत आहे. त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय, असा इशारा तुकाराम सुपेंनी दिला आहे. टीईटी घोटाळा उघड झाल्यापासून तो तणावात असल्याची माहिती सुपेंचे वकील अॅड. मिलिंद पवार (Milind Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांनी दिली आहे.

Tukaram Supe

टीईटी पेपरफुटी वर्षा गायकवाडांना आली जाग, घेतला हा निर्णय..

सुपेंचे वकील अॅड मिलिंद पवार म्हणाले की, सुपेंच्या म्हणन्यानुसार 2017 मध्ये ज्या कंपन्या होत्या, त्यांनाच काम दिले होते. मात्र, या प्रकरणात मलाच बळीचा बकरा बनवले जात आहे. 2017 साली ही कंपनी कोणी पुढे आणली याचाही तपास व्हायला हवा. तसेच. मी पोलिसांना जशी माहिती दिली तसा तपास झाला तर, अनेक गोष्टी समोर येतील, अशी प्रतिक्रिया सुपेंकडून देण्यात आल्याची माहिती त्याचे वकील अॅड. पवार यांनी दिली. याप्रकरणी सुपेच्या परिवारातील सदस्यांनाही आरोपी करणार असल्याची पुणे पोलिसांची तयारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आल्याचे त्यांच्या वकीलाने सांगितले आहे. या प्रकरणी मला टार्गेट केल जात असून मला आता आत्महत्या करावीशी वाटते, असा इशाराही सुपेंनी दिला आहे.

Tukaram Supe

टीईटी गैरव्यवहार प्रकरणात परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे अटकेत

टीईटी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी सुपेंच्या कार्यालयात व त्यांच्या संबधीतांकडे टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये 3 कोटी 87 लाखांचे घबा़ड पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये सोने आणि चांदीचाही समावेश आहे. याप्रकरणी सुपेंची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनीही या गैरव्यवहारात मदत केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी त्याचींही चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी या दोघांना चौकशीला बोलावले होते. व त्यानंतर त्यांच्याकडूनही छापा मारून 1 कोटी 58 लाख रोकड व सुमारे 70 लाखांचे सोने हस्तगत केले होते. या टीईटी गैरव्यवहार प्रकरणी सुपे आणि अभिषेक सावरीकर, प्रितेश देशमुख यांच्यासह अन्य साथीदारांवर सुद्धा आरोप झाले असून त्यांचा तपास सुरू आहे.

Tukaram Supe

तो अवघा १७ वर्षाचा...मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत त्याने मृत्यूला कवटाळले!

दरम्यान, टीईटी परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारच्या कारभारावर सडकून टीका केली असून या प्रकरणाची चौकशी ही सीबीआय मार्फत करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. यावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लगेच सखोल चौकशीसाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

यामार्फत टीईटी परिक्षा तसेच, जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल 15 दिवसांत गायकवाड यांच्या सादर करण्याचा शासन निर्णय 20 डिसेंबरलाच जारी करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com