Raj Thackeray Sarkarnama
पुणे

शिवसेनेचा दे धक्का! राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला पुण्यात पाडणार खिंडार

राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा अन् उद्याच धक्का देण्याची शिवसेनेची खेळी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा वादग्रस्त ठरली होती. या सभेनंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर आता पुण्यातील सभाही वादळी ठरण्याची शक्यता आहे. या सभेची मनसेकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू असतानाच शिवसेनेनंही मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. या सभेदिवशीच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Raj Thackeray Latest Marathi News)

मनसेला लागलेली गळती थांबत नसल्याचे चित्र असताना आता पुण्यात पक्षाला खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरेंची उद्या (ता.२२) पुण्यात सभा आहे. उद्याच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शहर कार्यालयात उद्या हा कार्यक्रम होईल. यातून राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला मोठा धक्का देण्याची खेळी शिवसेनेनी खेळल्याचं समोर येतं आहे. याआधीही पुण्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते. काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित केला होता. पुण्यातील सभा मात्र होणार असून, मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. ही सभा गणेश कला क्रीडा मंच येथे उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे. या सभेचा टिझरही रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये राज ठाकरें काय बोलणार, याची झलक पाहायला मिळते.

'सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे', अशी टीझरची सुरूवात आहे. त्यानंतर अभी नहीं तो कभी नहीं, हे राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेतील भाषणातील वाक्यही त्यामध्ये आहे. त्यावरून आता राज ठाकरेंची तोफ पुण्यातही धडाडणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. प्रामुख्याने औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या समाधीचा मुद्दा त्यांच्याकडून प्रखरपणे मांडला जाऊ शकतो. बुडाला औरांग्या पापी, म्लेंच्छसंव्हार जाहाला, मोडलीं मांडली छेत्रें, आनंदवनभुवनीं! असंही टीझरमध्ये लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT