राणा दांपत्याला दणका! कधीही पडू शकतो घरावर हातोडा

शिवसेनेशी पंगा राणा दांपत्याला महागात पडणार
Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Navneet Rana and Ravi Rana Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : हनुमान चालिसा प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्यानं वाद ओढवून घेतला होता. या प्रकरणी ते जामिनावर सुटले आहेत. असे असले तरी त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांचं मुंबईतील निवासस्थानच धोक्यात आलं आहे. हे बांधकाम पाडून टाकण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं बजावली आहे. (MP Navneet Rana Latest Marathi News)

मुंबईतील खार येथील राणा दांपत्याच्या निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे. राणा दांपत्यानं १५ दिवसांच्या आत बांधकाम पाडावं नाहीतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. राणा दांपत्यांचा खार येथील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. त्या अपार्टमेंटचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं महापालिकेनं जाहीर केलं आहे. त्यानंतर महापालिकेनं राणा दांपत्याला ७ दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीची मुदत संपल्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा राणा दांपत्याला नोटीस बजावली आहे. याचबरोबर कारणे दाखवा नोटिशीला राणा दांपत्यानं दिलेली उत्तरे महापालिकेने अमान्य केली आहेत.

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
राबडीदेवींचा रुद्रावतार पाहून लालूंचे कार्यकर्ते मागे हटले अन् सीबीआय अधिकारी सुटले

राणा दांपत्याची काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दांपत्याने थेट दिल्ली गाठली आहे. तिथं पत्रकार परिषदा, माध्यमांना मुलाखती देत हे दांपत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. आपण हनुमान भक्त असल्याचं सांगत त्यांच्याकडून हनुमानासाठी 14 दिवसच काय पण 14 वर्षे तुरुंगात जाऊ असं तुरुंगात सुटल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं.

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
सिद्धू कैदी नंबर २४१३८३! असं असेल कारागृहातील रोजचं रूटीन

मात्र, राणा दांपत्याच्या एका व्हिडीओची नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला होता. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत हनुमानाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसते. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या हनुमान भक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. मुलाखतीदरम्यान सूत्रसंचालिका ही नवनीत राणांना एक प्रश्न विचारते. तुम्ही हनुमानाचे एवढे भक्त आहात, मग हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं?, हे सांगा. या प्रश्नावर नवनीत राणांना काय उत्तर द्यावे, हे सुचत नसल्याचे व्हिडीओ दिसते. रवी राणा यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनीही मान खाली घातली. दोघांनीही हे माहिती नसल्याचे व्हिडीओ दिसते.

दोघांनाही उत्तर माहिती नसल्याचे पाहून सूत्रसंचालिकेनं पुन्हा तोच प्रश्न विचारला. हनुमानाचं नाव आधी हनुमान नव्हते. ते कसं पडलं, असं तिनं विचारलं. त्यावर नवनीत राणांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत सांगितलं की, तुम्ही आता इतिहासात नेणार असाल तर आम्ही माहिती घेऊ. इतिहास पुन्हा वाचू. मी हनुमान चालिसा वाचते, त्याविषयी नक्की बोलेन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com