Murlidhar Mohol, Ajit Pawar
Murlidhar Mohol, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Twitter War : मुरलीधर मोहोळांनी अजितदादांना विचारला जाब

सरकारनामा ब्युरो

पुणे : दोन दिवसापूर्वी पुण्यात झालेल्या पावसावरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकारण तापलं आहे. पावसामुळे पुण्यात झालेल्या नुकसानीला भाजपला जबाबदार धरत अनेक नेत्यांनी टीका केली आहे. तर भाजपनं त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

पुण्याच्या पावसावरुन निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांच्यात जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी टि्वट करीत एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. समाजमाध्यमावरील त्यांच्यातील टि्वट वॅार चर्चेचा विषय बनले आहे.

"स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील," असे टि्वट अजित पवार यांनी केलं होते.

"तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत," असे अजित पवार यांनी टि्वटमध्ये म्हटलं होत.

अजित पवारांच्या या प्रश्नांना मुरलीधर मोहोळ यांनी टि्वट करीत सडेतोड उत्तर दिले. बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? अशा प्रकारचे प्रश्न विचारत मुरलीधर मोहोळांनी शहरातील रखडलेल्या कामांवरुन त्यांना जाब विचारला आहे.

"बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले? आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण ? PMPML का खिळखिळी झाली? सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली? कचऱ्याची समस्या का झाली? BRT बळींचं पाप कोणाचं? या प्रश्नांची उत्तरे पुणेकरांकडे आहे," असा टोला मोहोळ यांनी अजितदादांना लगावला आहे.

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्षे पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरुन वाहत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला लगावला आहे. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यांचं काम पाण्यातून वाहत आहे, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT