मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या(ncb) विशेष सतर्कता तपास पथकाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनवरील (aryan khan) ड्रग्ज प्रकरणाच्या नवीन कारवाईशी संबंधित तपास अहवाल दिल्ली मुख्यालयाला पाठवला आहे. (aryan khan drug case latest news)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही, असा दावा एनसीबीच्या स्पेशल टीमने आपल्या अहवालात केला आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह एनसीबीनं उपस्थित केले.
आर्यनवरील ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या तपास पद्धतीवर पत्रकार परिषदा घेऊन अनेक वेळा गंभीर आरोप केले होते. एनसीबीचे तत्कालीन तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मंगळवारी एनसीबीच्या स्पेशल टीमने हा दावा केल्याने आता नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनी टि्वट करीत एनसीबीच्या या अहवालावर भाष्य केले आहे. "सत्य हे अग्निसारखं असते. आणि सत्य सांगितल्यावर त्याची झळ सोसावी लागते," अशा शब्दात सना यांनी टि्वट केलं आहे.
त्यावेळी जे अधिकारी कार्यरत होते ते आजही कार्यरत आहेत. त्यांच्या कामातील अनेक त्रुटी तपासादरम्यान समोर आल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. या प्रकरणात सात ते आठ अधिकाऱ्यांची भूमिका तपास पथकाला संशयास्पद वाटली आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी सुरू झाली आहे. आणखी दोन प्रकरणांतही या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका समोर आली आहे. याशिवाय एनसीबीच्या बाहेर असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी मागितली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.