chandrakant patil Latest News
chandrakant patil Latest News  sarkarnama
पुणे

पालकमंत्री चंद्रकांतदादांसमोरच भाजपच्या दोन आमदारांमध्ये जुंपली...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल बांधला जात आहे. याचवेळी वडगावकडून स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी माणिकबाग येथे भुयारी मार्ग करावा अशी मागणी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे. मात्र,या मागणीला पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी विरोध दर्शविला आहे. आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच भाजपच्या दोन आमदारांमध्ये भुयारी मार्गाच्या कामावरुन जुंपली.( BJP Mla Madhuri Misal and Bhimrao Tapkir news)

पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्य कामासंबंधीची आढावा बैठक घेतली.यावेळी आमदार भीमराव तापकीर यांनी माणिकबाग येथील भुयारी मार्गाची आग्रही भूमिका घेतली. यावर महापालिकेच्या अधिकार्यांनी अपुऱ्या जागेमुळे भुयारी मार्ग शक्य नसल्याचे सांगितले. तरीदेखील भुयारी मार्गाच्या मागणीबाबत तापकीर हे कायम होते. यावर आमदार माधुरी मिसाळ यांनी विरोध केला.

आमदार मिसाळ म्हणाल्या, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या संदर्भात अनेकदा बैठका झाल्या, सादरीकरण झाले, त्यावेळी तुम्ही ही मागणी का केली नाही, आता या उड्डाणपुलाचे काम थांबविणे शक्य नाही.त्यावरून या दोन्ही आमदारमध्ये खडाजंगी झाली. त्यावरून भाजपच्या दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाली.

अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करून भुयारी मार्गाबाबत त्रयस्थ संस्थेद्वारे पडताळणी करण्याचे आदेश दिले. पाटील म्हणाले, याठिकाणी भुयारी मार्ग शक्य आहे की नाही हे त्रयस्थ संस्थेमार्फत तपासून बघावे. आराखड्यात काही बदल होणार असल्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT