Baramati Municipal Corporation  Sarkarnama
पुणे

Baramati News : बारामतीत तणावाचं वातावरण; 'या' मुद्द्यावरून दोन संघटना आमने-सामने

Baramati Police : नगरपालिकेत दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

Pune News : बारामती येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त दोन संघटना आमने-सामने आल्या. परिणामी शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दोघांनी नगरपालिका कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळवताना पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाची मोठी दमछाक झाली.

टिपू सुलतान जयंती साजरी करण्याच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण तयार झाले होते. बारामतीत एका संघटनेच्या वतीने जयंती साजरी करण्यासाठी फलक लावण्यात आले होते. या वेळी मिरवणुकीचेही आयोजन केले जाणार होते. यावर दुसऱ्या एका संघटनेने आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे बारामती पोलिस ठाण्यात दोन्ही संघटनांची बैठक होऊन मार्ग काढण्यात आला होता. यानंतर नगरपालिकेत आलेल्या एका गटाने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी तसेच परवानगी देऊ नये, अशी मागणी केली.

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी त्यातील दोघांनी आणलेल्या रॉकेलचे कॅन अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तेथील पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना परावृत्त केले. या प्रकारामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. परिणामी नगरपालिकेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नगरपालिकेतील घटनेमुळे शहर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत बारामतीत जागोजागी चोख बंदोबस्त तैनात केला. शहरातील वातावरण शांत असून, नागरिकांनी सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT