Dhangar Reservation : आरक्षणासाठी धनगर समाजाची आक्रमक भूमिका; बारामती बंदची दिली हाक

Ram Shinde, Supriya Sule : शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार
Dhangar Protest in Baramati
Dhangar Protest in BaramatiSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्यात धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर जिल्ह्याील चौंडी येथील उपोषणानंतर सरकारला ५० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती दोन दिवसांनी संपणार आहे. या काळात धनगर आरक्षणाबाबत सरकारने ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप होत आहे. यावर बारामती येथे समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. (Latest Political News)

बारामती येथील प्रशासकीय इमारत परिसरात चंद्रकांत वाघमोडे बेमुदत उपोषणास बसले आहे. या उपोषणाचा बुधवारी सातवा दिवस होता. दरम्यान, वाघमोडे यांची प्रकृती खालावत चालली आहे. असे असतानाही सरकारकडून दखल घेतली जात नाही. परिणामी आक्रमक झालेल्या समाजाच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी बारामती बंदची हाक दिली आहे. याबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Dhangar Protest in Baramati
Rohit Pawar : कुटुंब म्हणून आम्ही एकत्र, राजकीय जीवनात आता विचाराने वेगळे; रोहित पवारांचे मोठे विधान

या निवेदनात म्हटले की, धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ९ नोव्हेंबरपासून चंद्रकांत वाघमोडे बेमुदत उपोषणास बसले आहेत. आता त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याने समाजाच्या भावना तीव्र होत आहेत. समाजाच्या मागणीला बळ देण्यासाठी गुरुवारी बारामती बंदचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.

Dhangar Protest in Baramati
Rohit Pawar On BJP : भाजपला ६० वर्षांपासून शरद पवारांची भीती अन् ती...; रोहित पवारांचा टोला
Letter to Tahsildar
Letter to TahsildarSarkarnama

बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनास खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार राम शिंदेंनी भेट दिलेली आहे. खासदार सुळेंनी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उपोषणस्थळावरून कॉल केला होता. तसेच उपोषण मागे घेण्याचे आवाहनही समाजाच्या कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, सरकारकडून ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आरक्षणाचा लढा कायम राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

भाजप आमदार राम शिंदे यांनी बुधवारी दुपारी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. चौंडी येथील आंदोलनानंतर ५० दिवसांची मुदत संपत आली तरी सरकार सु्स्त असल्याची खंत उपोषणकर्त्यांनी त्यांच्यापुढे व्यक्त केली. या वेळी शिंदे यांनी समाजाच्या आरक्षणप्रश्नी सरकारशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याची ग्वाही उपोषणकर्त्यांना दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Dhangar Protest in Baramati
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत सरकारशी चर्चा करणार; राम शिंदेंचा बारामतीत शब्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com