Uniform Civil Code : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरमोदी सरकारकडून देशामध्ये समान नागरी कायदा विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. या कायद्यामुळे विवाह कायदा, घटस्फोट, दत्तक घेणे, संपत्तीचे हक्क इत्यादी कायद्यांबाबत महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे या कायद्याचा मसुदा कसा असेल, यात विविध समूहांचा विचार केला जाईल होईल का? अशीही चर्चा होताना दिसत आहे. समान नागरी कायदा आणल्याने नेमके काय बदल होणार? याबाबत प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (Aseem Sarode) यांनी 'सरकारनामा"शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
असीम सरोदे म्हणाले, "समान नागरी कायदा असला पाहिजे, अशी तरतूद भारतीय संविधानातल्या कलम ४४ मध्ये अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे संविधानातल्या कलम ३७ मध्ये सुद्धा मार्गदर्शक तत्व आहे की, समान नागरी कायदासारखे कायदे आपण आणू शकतो, जे देशातल्या सर्व लोकांसाठी समान असतील."
समान नागरी कायदा आणायचा असेल तर अल्पसंख्यांक समाज आणि लैंगिक अल्पसंख्यांक यांचाही विचार झाला पाहिजे. लैंगिक अल्पसंख्यांकांचेही विवाहाचे आणि एकत्रित राहण्याचे प्रश्न तयार झाले आहेत. या सर्व समूहांचा विचार करून समान नागरी कायदा आणावा लागेल. विवाहाचा कायदा सोडला तर आता जवळपास ९८ टक्के कायदे समानच आहेत, असेही सरोदे म्हणाले आहेत.
समान नागरी कायदा आणायचा असेल तर अल्पसंख्यांक समाज आणि लैंगिक अल्पसंख्यांक यांचाही विचार झाला पाहिजे. लैंगिक अल्पसंख्यांकांचेही विवाहाचे आणि एकत्रित राहण्याचे प्रश्न तयार झाले आहेत. या सर्व समूहांचा विचार करून समान नागरी कायदा आणावा लागेल. विवाहाचा कायदा सोडला तर आता जवळपास ९८ टक्के कायदे समानच आहेत, असेही सरोदे म्हणाले आहेत.
"आता विवाह नोंदणी कायदा हा समान नागरी कायद्याचंच एक स्वरूप आहे. विशेष विवाह कायदा जो आहे, म्हणजे वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना विवाह करायचं असेल तर या कायद्याच्या तरतूदीनुसार ती करण्याची मुभा आहे. मात्र आता जर समान नागरी कायदा आणला तर सर्व समूहांच्या शंका - कुशंका, समज गैरसमज दूर केल्या पाहिजेत. सगळ्या जाती धर्मातल्या रूढी - पंरपंरा विचार करून, त्याचे अध्ययन करून ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, अन्यायकारक नसतील अशा सर्व रूढी परंपरांच एकत्रिकरण करून मगच समान नागरी कायद्याचा मसुदा घ्यावा लागेल. यावर नागरिकांचे म्हणणे मागवावे लागेल," असे असीम सरोदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.