Buldana Samruddhi Mahamarg Accident :
Buldana Samruddhi Mahamarg Accident :Sarkarnama

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू ; गंगावणे कुटुंबावर काळाचा घाला..

Buldana Samruddhi Mahamarg Accident : मुलीला नुकतंच मेडीकलला अॅडमिशन मिळालं होतं..
Published on

Buldana Samruddhi Mahamarg Accident : बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात निरगुडसर गावातील (ता.आंबेगाव) येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. निरगुडसर (Nirgudsar) या गावचे रहिवासी प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८), त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८), व मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी अपघातता मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गंगावणे कुटुंबियांवर व निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.

Buldana Samruddhi Mahamarg Accident :
Samrudhhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघात कशामुळे टायर फुटल्यानं की चालकाचे नियंत्रण सुटल्याने ? ; अहवालात..

गंगावणे कुटुंब (Gangavane Family) हे मूळचे शिरूर तालुक्यातले, मात्र नोकरीमुळे ते निरगुडसर येथे राहायला होते. मृत पावलेले कैलास गंगावणे हे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात मागील २७ वर्ष प्राध्यापक म्हणून रूजू होते. नुकतंच गंगावणे कुटुंबीयातील मुलाला नारपूर येथील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. मुलाची सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला सोडून गंगावणे कुटुंब विदर्भ ट्रॅव्हल्स बसने पुण्याकडे निघाले होते. मात्र पहाटे झालेल्या सिंदखेड राजा येथे पिंपळखुटा येथील अपघातात गंगावणे कुटुंबातील तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. गंगावणे कुटुंबातील सदस्यांनी या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा अपघातात मृत्यू झाला होता.

Buldana Samruddhi Mahamarg Accident :
HAS Oshin Sharma : सोशल मीडियावर 'या' महिला ऑफीसरची क्रेझ, चित्रपटाच्या ऑफर्स नाकारून निवडला वेगळा मार्ग!

अपघाताची माहिती मिळताच कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळेंनी प्रवासाला निघालेल्या गंगावणे कुटुंबियांचा शोध सुरू केला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांचे स्वीय साहाय्यक असलेले रामदास वळसे पाटील यांनी देखील गंगावणे कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी ताततडीन हालचाली केल्या. पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. या बसमध्ये प्रवासाला निघालेल्या यादीत गंगावणे कुटुंबातील या तिघांचाही समावेश असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Buldana Samruddhi Mahamarg Accident :
Buldhana Bus Accident News : 'समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा, अपघात रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत'; थोरातांची मागणी!

गंगावणे कुटुंबावर काळाने घातलेल्या घालाने निरगुडसर गावात शोककळा पसरली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अश्रू अनावर झाले आहे. प्राध्यापक गंगावणे कुटुंबातील या दुर्दैवी घटनेमुळे विद्यालयात शोकसभेत श्रद्धांजली व्यक्त करुन विद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गंगावणे कुटुंबातील मुलगी सई गंगावणे ही हुशार विद्यार्थीनी होती. तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेद महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com