Pune News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.सरकारवर अजूनही मराठा आरक्षणावर तोडगा काढू शकली नाही. त्याच मुद्द्यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर ते वास मारतचं. जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केलं तर चीड येणारच. ज्या लोकांनी मंडल आयोग जाहीर केलं त्या वेळेस सगळं केलं असतं तर हा विषय राहिलाच नसता, अशी आक्रमक भूमिका उदयनराजे यांनी घेतली.शिक्षण क्षेत्रामध्ये फी मधील तफावतीमुळे समाजातील मुले त्रासले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी यावरती विचार करून तोडगा काढणे आवश्यक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इतर राज्यांमध्ये आरक्षणाची मर्याद वाढवण्यात आली आहे. याची आठवण करून देत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात देखील आरक्षणाची मर्यादा वाढवा. सहज प्रश्न सुटतील. 70 ते 72 टक्के आरक्षण होऊ द्या. हाच पर्याय आहे, असे सांगत मराठा समाजाला आरक्षण तिढा सोडवण्याबाबत उत्तर उदयनराजे यांनी दिलं. राज्यपातळीवर कुठल्याही समाजाला न दुखावता हा प्रश्न सुटू शकतो, असे उदयन राजे म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात बुधवारी निकाल दिला. या निकालानंतर ठाकरे गटाकडून ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले.याच निकाला संदर्भात ही परिस्थिती का निर्माण झाली. या विचार करायला हवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना उदयनराजे यांनी टोला लगावला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.