Uday Samant News  Sarkarnama
पुणे

Uday Samant News : मोदींविरुद्ध पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करुन दाखवा; उद्योगमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान!

Uttam Kute

Pimpri Chinchwad News : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची चौथी बैठक नियोजित असून लवकरच ती पार पडणार आहे. पण, त्यापूर्वीच यावर महाराष्ट्रातील युती सरकारचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी (ता.२३ फेब्रुवारी ) पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे हल्लाबोल केला. प्रथम त्यांनी मोदींविरुद्ध पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे धाडस दाखवावे आणि मग इंडिया आघाडी करावी, असे थेट आव्हानच विरोधकांना दिला. (Uday Samant News)

इंडिया आघाडीच्या तीन बैठका पाहिल्या. त्यातील पहिल्या मिंटींगला होते, ते दुसरीला नव्हते आणि दुसऱ्या वेळी उपस्थित होते ते तिसऱ्या बैठकीला नव्हते. तर, तिसऱ्या मिटिंगला जे उपस्थित होते आणि पंतप्रधानपदाचे दावेदारही होते, तेच (बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार) आता बाजूला गेले आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत त्यांनी आपला मोदींविरुद्धचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे धाडस दाखवावे मगच इंडिया-बिंडिया करावे, असे थेट आव्हान सामंत यांनी दिले. देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्स्पो प्रदर्शन उद्यापासून (ता.24 फेब्रुवारी) मोशी येथे भरणार आहे. त्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सामंत आले होते. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीला चॅलेंज दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील आणि अजय महाराज बारसकर यांच्यात सुरु झालेले आरोप,प्रत्योरोप आणि वाद याच्याशी राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सबंध नसल्याने त्यात त्यांना ओढू नये,असे आवाहन सुद्धा सामंत यांनी यावेळी केले. कारण राज्य सरकारने टिकणारे मराठा आरक्षण दिले आहे, असा दावा त्यांनी केला. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस सरकारने ते दिले होते. पण,ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उद्या दुपारी तीन वाजता संरक्षण राज्यमंत्री अजय भट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. ते आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे, असे सामंत म्हणाले.

हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. त्यात हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येतील. सैन्यात येण्याविषयी त्यात तरुणांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पन्नास हजार विद्यार्थी त्याला भेट देणार आहेत. त्यात चार भव्य दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा अशी नावे देण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT