Uday Samant Rising Political Ambitions - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्याभोवती उलटसुलट चर्चा रंगत आहेत. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांची गरज संपली असून, उदय सामंत यांचा 'नवा उदय' होईल, अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ''उदय सामंत यांच्या महत्त्वकांक्षा चरणबिंदूला पोहचल्या असून शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इरादा आहे.'' अशी टीका ठाकरेग गटाकडून करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. अंधारे म्हणाल्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एखाद्या पक्षाचे प्रमुख भेटत असतील तर त्याचे वेगळे अर्थ काढण्याचं काही कारण नाही. एका स्वतंत्र पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे हे एखाद्या कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात यामध्ये वावगं वाटण्यासारखं काही नाही.
मात्र महाराष्ट्राची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावेत आणि त्या इच्छेचा अवमान आम्ही करणार नाही. मात्र त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. युतीसाठी आम्ही सकारात्मक आणि संयमी आहोत परंतु याचा अर्थ आम्ही हतबल, अगातीक आणि हिनदीन आहोत असं समजण्याच कारण नाही. शिवसेनेचे एक ठरले आहे, आला तर तुमच्या बरोबर आणि नाही आला तर तुमच्याशिवाय, राज्यामध्ये महाराष्ट्र द्रोह्यांशी लढण्याचे निश्चित केले आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
एकीकडे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट असता होत असताना दुसरीकडे मनसे नेते उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याचे पाहायला मिळालं याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, सध्या उदय सामंतांच्या महत्त्वकांक्षा या चरमबिंदूला पोहोचल्या आहेत. सध्या राजकीय पटावरून एकनाथ शिंदे यांचं महत्त्व खूप कमी झालं आहे. एकनाथ शिंदे हे चर्चेतून बाजूला झाले असून उदय सामंत यांचं महत्त्व वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, त्यामुळे शिंदेंच्या पक्षांमध्ये शिंदेंपेक्षा देखील उदय सामंत हे महत्त्वाचे नेते आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न ठरवून फडणवीसांकडून केला जात असण्याची शक्यता आहे. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
याशिवाय अंधारे पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे की विकास कामाबाबत तत्परतेने व्यक्त होण्यापेक्षा कुटुंब, पक्ष आणि नाते संबंध तोडण्यासाठी अधिक तत्परतेने पुढे यायचं. आत्तापर्यंत फडणवीस यांनी बापापासून लेक, भावापासून बहीण, काका पासून पुतण्या तोडला आहे. आता ते भावापासून भाऊ तोडण्यासाठी देखील तत्पर आहेत. मात्र रक्ताची नाती ही अधिक घट्ट असतात असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.