Aircraft Maintenance - विमानांची देखभाल कशी केली जाते, तांत्रिक बिघाड का उद्भवतात?

Learn how aircraft maintenance is performed - उड्डाणापूर्वीच प्रत्येक विमानाची वेगवेगळ्या पातळीवर तपासणी झालेली असणे अत्यंत आवश्यक असते.
Aircraft Maintenance
Aircraft Maintenancesarkarnama
Published on
Updated on

Common Causes of Technical Faults in Aircraft -अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले असून, या दुर्घटनेचा बारकाईने आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान होते, ज्याचा अपघाताचा कोणताही इतिहास नाही. मात्र तरीही हा अपघात झाल्याने आता यामागील कारणांचा शोधही घेतला जात आहे. 

याच पार्श्वभूमीवर आपण विमानाच्या देखभाल व उड्डाणपूर्व तपासणीबाबत जाणून घेऊयात. व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांपेक्षा जास्त लक्ष दिले जाणारे पैलू म्हणजे त्याची देखभाल व प्रत्येक उड्डाणापूर्वीची त्याची काटेकोर तपासणी असतात. प्रत्येक विमानाची वेगवेगळ्या पातळीवर तपासणी झालेली असणे अत्यंत आवश्यक असते. उड्डाणापूर्वी पायलट ते देखभाल कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांकडून कॉकपिटमधील उपकरणांना मान्यता मिळालेली असणे आवश्यक असते. शिवाय, तपासणीची श्रेणी अ ते ड पर्यंत असतात. प्रत्येक तपासणीची पद्धती स्वतंत्र आणि वेगळी असते.

आपण व्यावसायिक उड्डाणांशी संबंधित देखभाल पैलूंवर बारकाईन नजर टाकली तर आपल्या सहज लक्षात येईल की, हा संपूर्ण विमान उद्योग देखभाल आणि तपासणीवर अवलंबून आहे. विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाचा असा विश्वास आहे, की रस्त्यावर वाहन चालवण्यापेक्षा विमान उडवणे सोपे आहे. मात्र जर तुम्हाला त्यात प्रशिक्षण दिले असेल, परंतु त्याचा देखभाल भागही तितकाच गंभीर आहे.

Aircraft Maintenance
Ahmedabad Plane Crash - ३७ वर्षांपूर्वीही भीषण विमान अपघाताने हादरले होते अहमदाबाद ; १३३ प्रवाशांचा गेला होता जीव

भारतात स्पाइस जेट विमानातील तांत्रिक समस्या आजकाल चर्चेचा विषय बनला आहे. अठरा दिवसांत या एअरलाइन्सच्या विमानात सर्व प्रकारच्या समस्या आल्या आहेत. कोणताही अपघात झाला नसला तरी जे काही घडलं ते निश्चितच त्याच्या देखभाल पैलूकडे किंवा तपासणीच्या संपूर्ण प्रक्रियेकडे लक्ष वेधते.

स्पाइसजेटमध्ये, कधीकधी उड्डाणादरम्यान केबिनमध्ये धूर भरण्याची समस्या उद्भवली तर कधीकधी उड्डाणादरम्यान विंडशील्ड क्रॅक होण्याची समस्या समोर आली आहे. एकदा स्पाइसजेटचे विमान दिल्लीहून दुबईला जात असताना, इंधन निर्देशकामध्ये समस्या आल्याने पाच हजार फूटांवर उडणाऱ्या विमानाला पाकिस्तानच्या कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिग करावे लागले होते.

Aircraft Maintenance
Air India flight crashed : विमान कोसळण्याआधी 'Mayday Mayday'असं का ओरडत होता पायलट? काय होतो याचा अर्थ

याशिवाय स्पाइसजेटच्या एका मालवाहू विमानाच्या रडाराने काम करणे थांबवले होते, त्यामुळे त्याची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. जेव्हा एखाद्या एअरलाइन्सच्य विमानांबाबत वारंवार अशाप्रकारच्या समस्या येतात तेव्हा त्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची देखभाल असते.

भारतातील सर्व विमान कंपन्या स्वत:ची विमाने उडवत असतात. त्यांच्या विमानांची देखभाल त्यांच्या स्वत:च्या कंपन्यांकडून केली जाते किंवा त्यांनी बाह्य देखभाल कंपन्यांची मदत घेतलेली असते. तथापि भारतातील बहुतेक विमान कंपन्यांची देखभाल एअर इंडिया इंजिनिअरिंग करत आहे. ही एक पूर्णपणे स्वतंत्र कंपनी आहे. एअर इंडिया एअरलाइन्सल टाटा ग्रुपला विकूनही ही कंपनी अजूनही सरकारकडेच आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com