Eknath Shinde And Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पुणे

Chandrashekhar Bawankule : भाजपमध्ये आलेल्या 'त्या' ५ माजी नगरसेवकांची तोंड बावनकुळेंनी बंद करावीत; शिंदे सेनेतील मंत्र्याचा थेट इशारा

Uday Samant On former corporators join BJP : नुकताच पुण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Aslam Shanedivan

Pune News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गळती लागली आहे. सेनेतील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा असतानाच पुण्यात पाच माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी या पाच जनांनी भाजपमध्ये केला होता. तसेच शिवसेना कोणाची यावर भाष्य करताना ती शिवसेना उद्धव ठाकरे यांची असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून आता महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या नगरसेवकांना समज द्यावी, असे आवाहन केले आहे.

दोन दिवसापूर्वी पुण्यातील माजी नगरसेवकांनी शिवसेनाला अखेरचा रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी खरी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नसून ती उद्धव ठाकरे यांची असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला होता. यावरून पुण्यात महायुतीतील नेत्यांमध्ये चांगलीच लागली आहे.

दरम्यान यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुण्यात शुक्रवारी (ता. 10) यावर भाष्य केले. तसेच याप्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करावे असे आवाहन केले आहे. तसेच भाजपमध्ये आलेल्या ५ माजी नगरसेवकांना समज देऊन तोंडं बंद करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी सामंत यांनी महायुतीचा धर्म भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्ष पाळत आहेत. ते धर्म पाळून राज्यात काम करत आहेत. मात्र आज काही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोकांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी आधी नगरसेवक होण्यासाठी तिकीट मिळते का? याचा विचार करावा? आणि जर तिकीट मिळालेच तर ते निवडणून येतील का याचे आत्मचिंतन करावे, असा टोला लगावला आहे. तर अशा प्रकारे शिवसनेवर टीका करणाऱ्या या पाच जणांची तोंड प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच बंद करावी, असेही सामंत म्हटले आहे.

म्हणून सुपडासाफ झाला

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेल्या सुपडासाफवर सामंत यांनी प्रतिक्रीया दिली. त्यांनी याआधी उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांना बर्फावर झोपविण्याची धमकी दिली होती. पण जनतेनं त्यांचं काय केलं? जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला आणि महायुतीला निवडून दिलं.

त्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. पण आता त्यांचे नेते आदित्य ठाकरे यांना असुरक्षित वाटत असल्यानेच ते सारखं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असल्याचा टोला यावेळी उदय सामंत यांनी लगावला आहे. तसेच राज्यात जर कोणी खंडणी मागत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही, त्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT