Uday Samant : मला आरोग्य मंत्रिपदाची ऑफर होती; पण... : उद्योग मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

Mahayuti Government : मी एकनाथ शिंदे यांना सांगितले की, सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी माझ्यावर येणार असेल तर आरोग्य मंत्रिपद मी हसत हसत स्वीकारेन.
Eknath shinde-Uday Samant
Eknath shinde-Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri, 26 December : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपाच्या चर्चेवेळी माझ्याकडे आरोग्य खाते येणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला त्याबाबत विचारलेही होते. मीही हसत हसत आरोग्य मंत्रिपद स्वीकारेन, असे म्हटले होते. मात्र, तो राजकारणाचा एक भाग आहे, आरोग्य मंत्रालय माझ्याकडे आले नाही, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खाते वाटपावेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य केले.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोग्य मंत्रिपदाचा किस्सा सांगितला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या खातेवाटपावर बरेच दिवस खल चालला होता. विशेषतः भाजप आणि शिवसेनेत मंत्रालयावरून वाद असल्याची चर्चा रंगली होती. गृहमंत्रिपदावरून सुरुवातीपासून महायुतीमध्ये धूसफूस सुरू होती.

शिवसेनेकडे बांधकाम विभाग, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री ही महत्वाची खाती आली आहेत. याशिवाय मागील मंत्रिमंडळात असणारी मंत्रालयेही पुन्हा शिवसेनेकडे आली आहेत. मात्र, पक्षातही कोणतं खाते कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. त्यातच जनतेच्या आरोग्यासारखे जिव्हाळ्याचे खाते कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. त्या खात्याबाबत खातेवाटपावेळी झालेली चर्चा सामंत यांनी सांगितली.

Eknath shinde-Uday Samant
Radhakrishna Vikhe : विखे-थोरातांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार; महायुतीकडून संगमनेरमध्ये 'स्थानिक'साठी मोर्चेबांधणी

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, माझ्याकडे आरोग्य मंत्रालय येणार, अशा बातम्या पंधरा दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला त्याबाबत विचारलेही होते, ‘ज्या पद्धतीने आपण उद्योग विभाग चालवला, त्याच पद्धतीने आपण राज्याचा आरोग्य विभाग चालवावा,’ अशी सूचनाही त्यांनी मला केली होती.

Eknath shinde-Uday Samant
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार भाकरी फिरवणार, पक्ष संघटनेत मोठे बदल, प्रदेशाध्यक्ष बदलणार?

मी कधीही असं म्हटलं नव्हतं की, मला उद्योग खातंच पाहिजे. उलट मी एकनाथ शिंदे यांना सांगितले की, सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी माझ्यावर येणार असेल तर आरोग्य मंत्रिपद मी हसत हसत स्वीकारेन, त्याची चिंता करण्याची गरज नाही. पण ठीक आहे, तो राजकारणाचा एक भाग आहे, आरोग्य मंत्रालय माझ्याकडे आले नाही. पुन्हा एकदा माझ्याकडे उद्योग विभाग आला, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com