Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच राजकारण : उद्धव ठाकरेंनी 48 तासानंतर चुप्पी तोडली; कदमांना शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर

Uddhav Thackeray response on Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ केला, आरोप रामदास कदमांनी केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दसरा मेळाव्यामध्ये गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाचा बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस छळ केला, असे रामदास कदम यांनी मेळाव्यात म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे हाताचे ठसे घेतल्याचा देखील आरोप रामदास कदमांनी केला होता. रामदास कदम यांच्या आरोपानंतर याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला.

मात्र याबाबत उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमास भाष्य केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी गद्दार आणि नमक हरामांवर बोलत नाही. रामदास कदम हे हरामखोर आणि नमक हराम आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणजे काय आहे ते सबंध महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे अशा गद्दार आणि नमक हराम व्यक्तींच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या काही काळामध्ये अनेक जण शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले आहे. त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होते त्यामुळे ते सोडून गेल्याने मला त्रास होतो का? असं उद्धव ठाकरे यांना विचारला असता ठाकरे म्हणाले, सोडून गेलेला व्यक्तीनी टीका केल्यानंतर त्रास आणि वेदना होतेच परंतु त्याच वेळेला शिवाजी पार्कमध्ये हजारो लोकं पावसात भिजत माझं भाषण ऐकतात ते या वेदनांवरती रामबाण औषध असतं.

शिव्या देणाऱ्या पेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात हे अधिक महत्त्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT