Ramdas Kadam: बायकोला जाळलं की जळाली? परबांच्या आरोपावर कदमांचे उत्तर

Anil Parab allegations on Ramdas Kadam wife death: रामदास कदमांच्या बायकोने स्वःला 1993 मध्ये जाळून घेतलं की तिला जाळण्यात आलं याची चौकशी व्हावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.परबांच्या या आरोपाला कदमांनी सडेतोड उत्तर दिले.
Anil Parab allegations on Ramdas Kadam wife death
Anil Parab allegations on Ramdas Kadam wife deathSarkarnama
Published on
Updated on

Anil Parab News: दसरा मेळाव्यात "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता," असे विधान शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी केले. आहे. कदमांच्या या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर 14 वर्षांनंतर हा मुद्दा रामदास कदम यांनी उकरुन काढला आहे. यानंतर ठाकरे सेनेतील नेत्यांनी कदमांची कुंडलीच माध्यमांसमोर मांडली आहे. आज अनिल कदम यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदमांचे सगळचं काढले.

मृत्यूनंतर बाळासाहेबांचे ठसे उद्धव ठाकरे यांनी घेतले,असे आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंचे विश्वासू नेते अनिल परब यांनी चोख उत्तर देत 1993 चे प्रकरण काढून रामदास कदमांची कोंडी केली आहे.

रामदास कदमांच्या बायकोने स्वःला 1993 मध्ये जाळून घेतलं की तिला जाळण्यात आलं याची चौकशी व्हावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्यांनी खेडमध्ये कोणाला बंगाल बांधून दिला याची देखील सगळ्यांना माहिती आहे, असे परब म्हणाले. परबांच्या या आरोपाला कदमांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Anil Parab allegations on Ramdas Kadam wife death
PCMC Diwali Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर; खात्यात किती पैसे जमा होणार?

जेवण बनविताना माझ्या पत्नीच्या साडीला आग लागली होती. माझ्या पत्नीलाच मीच वाचवलं.तिला जसलोक हॉस्पिटला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मीही सहा महिने रुग्णालयात होतो. एखाद्याच्या आईची बदनामी करुन तुम्ही राजकारण करीत आहात, असा आरोप कदमांनी केला. आपण या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह तीन दिवस मातोश्रीत ठेवण्यात आले होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा आरोप कदमांनी दसरा मेळाव्यात केला होता. बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणाऱ्या कदमांनी नार्को टेस्ट करा, अशी मागणी परबांन केली आहे. यावर बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कदमांनी केली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, असेही कदम म्हणाले.

Anil Parab allegations on Ramdas Kadam wife death
High Court News : काय सांगता! जिल्हा सत्र न्यायाधीश पदासाठी एकही पात्र नाही! उच्च न्यायालयाकडून निकाल जाहीर

लोक हसतील म्हणून मला कमी महत्वाचे खातं दिले होते. मला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून मला त्या खात्याचे मंत्री केले होते. आगामी निवडणुकीत मराठी माणूस उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असे कदम म्हणाले.

Anil Parab allegations on Ramdas Kadam wife death
Pune Robbery: पुणे–नाशिक महामार्गावर रंगला थरार! दरोडेखोरांचा गोळीबार, काय घडलं?

अनिल परब काय म्हणाले...

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटला आहे. महाराष्ट्रातील मुलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा त्यांचा कुटील डाव आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर आमची नार्को टेस्टची तयारी आहे. पण त्यासोबतच ज्योती रामदास कदम यांनी १९९३ साली स्वत:ला का जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करा, असे परब म्हणाले.

१९९३ मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वत:ला जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करावी. योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत. त्यांच्या बापाने काय उद्योग केले याची चौकशी केली पाहिजे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचे वाकून या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. १९९३ साली गृह राज्यमंत्र्यांच्या आईने स्वत:ला जाळून घेतले होते या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला का जाळले, या घटनेचे साक्षीदार आजही आहेत. वेळ पडली की ते समोर येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com