Pune News, 27 Feb : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील (Swargate Bus Stand) शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
तर या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर सडकून टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच या घटनेनंतर संतापलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी स्वारगेट येथील बस आगार येथे जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली.
स्वारगेट स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक गंभीर प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्यांच्या याच कृतीची दखल पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतली आहे. शिवाय त्यांनी केलेल्या तोडफोडीबद्दल ठाकरेंनी मोरेंचे तोंडभरून कौतुक केलं आहे.
वसंत मोरेंशी फोनवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "वसंत मोरे तुम्ही चांगलं केलंत, जोरात केलंत. काय हे सगळं बोलण्याच्या पलिकडे चाललंय." यावर मोरे म्हणाले, हो साहेब एवढा घाणेरडा प्रकार होता एसटीमध्ये. शिवशाहीच्या चार बंद पडलेल्या बसेसमध्ये अक्षरशः लॉजिंग केलंय.
त्यानंतर ठाकरे म्हणाले, आपण जे काय लढतोय तेच सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. जीव जळतोय हे सगळं पाहून, महाराष्ट्र कुठे चाललंय? यां लोकांना पोलिसांचीही भीती नाही. पण तुम्ही चांगलं केलंत. सगळ्यांना धन्यवाद द्या आणि असेच जागते रहा, असं म्हणत त्यांनी मोरेंना कौतुकाची थाप दिली.
तर मोरेंनी देखील उद्धव ठाकरेंना धन्यवाद साहेब, तुमचा फोन आला खूप खूप बरं वाटलं, जय महाराष्ट्र, असं म्हणत फोन ठेवला. त्यामुळे ठाकरेंनी पुण्यातील शिवसैनिकांच्या आंदोलनाची दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.