Prakash Ambedkar News : राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण, स्वारगेट अत्याचार घटनेनंतर 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Swargate Rape Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्वारगेट अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा गांभीर्यपूर्वक तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.
Prakash Ambedkar Vs Devendra Fadnavis.jpg
Prakash Ambedkar Vs Devendra Fadnavis.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग व नेहमीच वर्दळीचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वारगेट बसस्थानकात धक्कादायक घटना घडली. शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधारी महायुतीवर टीकेचे आसूड ओढले जात आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठं विधान केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराच्या घटनेवर भाष्य करताना सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी पुण्यातील मध्यवर्ती स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार ही अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण,परिस्थिती तशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून,देशात महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असण्याचं मत आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पुण्यातील स्वारगेट सारख्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बस डेपोवर महिला सुरक्षित नाहीयेत तर महिला सुरक्षित आहेत कुठे?असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच या अत्याचार प्रकरणात पोलीस कारवाईच्या आधीच उलटसुलट चर्चा करताय. महिलेला परत अपमानित करू नका. कधीही पीडितांना ब्लेम केले जात नाही. स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Prakash Ambedkar Vs Devendra Fadnavis.jpg
Bajrang Sonwane : संतोष देशमुखांची बॉडी आरोपीच्या भोवऱ्यात असलेल्या PSI राजेश पाटील यांनाच कशी सापडली?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तसेच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील स्वारगेट अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा गांभीर्यपूर्वक तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.याचवेळी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील 23 जणांचं सुरक्षा रक्षकांची तडकाफडकी निलंबन केलं असून ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांच्या चौकशीच्या सूचना दिल्या आहेत.तसेच परिवहन विभागाला दोषींवर निलंबन कारवाईचे निर्देश दिले आहेत

पुण्यातील स्वारगेट तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे.या प्रकरणी तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला असून ससून रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे.या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.

Prakash Ambedkar Vs Devendra Fadnavis.jpg
Ajit Pawar On Swargate Crime : स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, आरोपीला फाशीच...

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणच्या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे, या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com