Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray : मुंबईनंतर उद्धव ठाकरेंचा पुण्यावर डोळा; काय आहे प्लॅन?

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाने विधानसभेच्या जागांसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना लवकरच उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकरेंनी मुंबईनंतर पुण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.

मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 25 जागांची डिमांड केली आहे. यानंतर पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 3 ऑगस्टला ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा पुण्यात शिबिर होणार आहे. पुण्यातील शिबिराला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray करणार मार्गदर्शन करणार असल्याचे आहेर यांनी स्पष्ट केले आहे.

आहेर म्हणाले, आताच्या संवादात पूर्ण ताकदीने भूमिका घ्यावी, तसेच पुणे जिल्ह्यात आणखी कसे काम करायचे, याबाबत चर्चा झाली. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत पुण्यातील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचेही आहेर यांनी स्पष्ट केले.

भोसरीच्या वादावर पडदा?

पिंपरी चिंचवड अजित पवार Ajit Pawar गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी भोसरी विधानसभा लढवण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यामुळे या मतदारसंघातील ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांची नाराजी दूर झाल्याचे आहेर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, भोसरी विधानसभेच्या मुद्द्यावर पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झालेली आहे. येथून कोणी उभ राहत नसताना आम्ही तिकडे तयारी केली होती. आता अजून फायनल झाले नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत चर्चा करूनच निर्णय घेणार आहोत.

आता त्यांची नाराजी दूर झालेली असून येथील पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार दिला तर काम करणार असल्याचे सांगितले आहे. भोसरी येथील पदाधिकाऱ्यांना काय सूचना द्यायच्या त्या दिल्याचेही आहेर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT