Ajit Pawar : विशाळगड हिंसाचारातील पीडितांना अजितदादांचा शब्द; म्हणाले, तोपर्यंत रहिवासी अतिक्रमणाला हात लावणार नाही

Ajit Pawar On Vishalgad Violence : "विशाळगड हिंसाचाराच्या घटनेचा पोलिसांकडून सर्व तपास सुरु आहे. व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट पाहून तपास सुरु आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
Ajit Pawar Visit Vishalgad
Ajit Pawar Visit VishalgadSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 18 July : कोल्हापुरातील विशाळगडवर (Vishalgad) झालेल्या हिंसाचारानंतर राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. विरोधकांनी हे सर्व सुनियोजित असून या हिंसाचारामागे सरकारमधील काही नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

बुधवारी (ता.17) जुलै रोजी काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) आणि आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडावरील नागिरकांची भेट घेतली होती. अशातच आज गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडावर ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणच्या लोकांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यानंतर अजितदादांनी (Ajit Pawar) कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असा विश्वास स्थानिकांना दिला. तसंच विशाळगडावरील व्यावसायिक अतिक्रमण काढण्यात आलं आहे. ज्या 13 अतिक्रमणावर स्थगिती आणली होती, ते अतिक्रमण काढलं नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं.

Ajit Pawar Visit Vishalgad
Shivsena Vs BJP : विशाळगडची दंगल ही विधानसभेपूर्वीची ट्रायल, ठाकरे गटाचा फडणवीसांवर गंभीर आरोप

पीडितांसमोर बोलताना अजित पवार म्हणाले, "गडावरील केवळ व्यावसायिक अतिक्रमण काढली आहेत. लोक राहतात ते अतिक्रमण सध्या तरी काढलं जाणार नाही. रहिवासी अतिक्रमण सप्टेंबरनंतर न्यायालयच्या नियमात राहून काढलं जाईल. न्यायव्यवस्थेच्यां बाहेर जाऊन काहीही केलं जाणार नाही. कोणीही असुदे जे चुकीचे असेल तेच काढले जाईल. तसंच सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वाना संरक्षण दिले जाईल," असं आश्वासन अजितदादांनी नागरिकांना दिलं.

Ajit Pawar Visit Vishalgad
Dhananjay Mahadik : 'कोल्हापूर उत्तर'वर भाजपचा दावा, धनंजय महाडिकांनी शिंदे गटाला डिवचले

संभाजीराजेंनी ऐकलं नाही

तसंच हिंसाचाराच्या घटनेचा पोलिसांकडून सर्व तपास सुरु आहे. व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट पाहून तपास सुरु आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्यातील सर्वच किल्ल्यावर जे अतिक्रमण आहे ते काढले जाईल, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं. तसंच संभाजीराजें (Chhatrapati Sambhajiraje) यांच्यासोबत प्रशासनाने चर्चा केली होती. सरकारने दोन दिवसाचा वेळ मागितला होता. पण त्यांनी ते ऐकलं नाही असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com