Uddhav Thackeray In Pune Sarkarnama
पुणे

Video Uddhav Thackeray : ...म्हणून मला पुणे जिंकायचंय; 'ते' फोटो दाखवत उद्धव ठाकरेंनी पुणेकरांसमोरच विजयाचा नारा दिला!

Jagdish Patil

Pune News, 03 August : शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंदिरात सुरु आहे. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आपणाला पुणं जिंकायचं आहे आणि ते का जिंकायचं आहे, याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

पुण्याचा शाश्वत विकास करण्यासाठी आपणाला जिंकायचं असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "पुणेकरांचा महापुराचा विषय आहे. कालच रिव्हर फ्रंट या विषयात अभ्यास करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी माझी भेट घेतली.

पुण्यात (Pune) आलेल्या पुरामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले. अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे. मात्र याला काहीजण कारणीभूत आहेत. ज्यांच्याकडून हे गुन्हे घडवले जातायत त्यांना लटकवण्याठी आपणाला जिंकलं पाहिजे. हा अख्खा विषय पुणेकरांचा आहे."

भाषणादरम्यान, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्टेजवरुन दोन फोटो दाखवले आणि पुण्यातील मुळा-मुठा नदीचा प्रवाह कशा पद्धतीने बदलण्यात आला आहे हे दाखवलं. नाईक बेटावर भराव टाकून नदीचा प्रवाह कशा पद्धतीनी बंद करण्यात आला, याचेही फोटो त्यांनी उपस्थितांना दाखवले.

फोटो दाखवल्यानंतर ते म्हणाले, "या बेटाच्या दोन्ही बाजूने नदीच प्रवाह जात होता. मात्र, एका बाजूला पूर्ण भराव टाकून नदीचा प्रवाह बंद करण्यात आला. मग नदी इकडे तिकडे घुसणारच, मला का जिंकायचं आहे कारण मला पुणे वाचवायचं आहे. मला पुण्याचा शाश्वत विकास करुन दाखवायचा आहे, यासाठी मला जिंकायचं आहे."

शिवाय पुण्याच्या विकासकामात मी मुख्यमंत्री अतानाही लक्ष घातलं नव्हतं, कारण त्यावेळी इथे पुण्याचे सुभेदार बसले होते. आपल्या सत्तेच्या काळात आपण ज्या गोष्टीला स्टे दिला होता. तीच कामे सरकार पडल्यानंतर राडा रोडा टाकून नदीचा प्रवाह बंद करुन टाकला आणि माझ्या पुणेकरांच्या घरात पाणी घुसलं.

हा विकास नाही तर भाजपला झालेला पैशाचा विकार आहे. यासाठी पुणेकरांना रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं आवाहन करत, हो तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा ललकारलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT