sanjay raut
sanjay rautsarkarnama

Sanjay Raut : संजय राऊतांनी टाकला नवा बॉम्ब, महाविकास आघाडीचं 'टेन्शन' वाढलं

Sanjay Raut Assembly Election 2024 : संजय राऊत म्हणतात, आपण विधानसभेच्या 288 उमेदवार उभे केले, तर 160 जागा निवडून येतील. मात्र...
Published on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे संकेत पुण्यात झालेल्या शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) 'शिवसंकल्प' मेळाव्यात मिळाले आहेत.

"मागील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांसाठी पालखी वाहिल्या आता शिवसैनिकांनी आपला विचार करावा," असं मत मांडत खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.

पुण्यात शिवसेनेचा ( ठाकरे गट ) 'शिवसंकल्प' मेळावा पार पडला. यावेळी नेत्या सुषमा अंधारे यांनी कोणाच्याही प्रेमापोटी आपल्या हक्क्याच्या जागा गमावू नये, असं आवाहन वरिष्ठ नेत्यांना केलं. तसेच, पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी आणि कोथरूड या तीन जागांवर दावा केला आहे.

यानंतर बोलायला संजय राऊत यांनी देखील जागा वाटपावरती भाष्य करत आगामी विधानसभेला जागा वाटपाबाबत शिवसेना ( Shivsena ) 'कॉम्प्रमाईज' करणार नाही, असा संकेत आहे.

sanjay raut
Sushma Andhare : मोठी बातमी! पवारसाहेबांच्या 2 मतदारसंघासह कोथरूडवर शिवसेनेचा दावा; भरसभेत अंधारेंची मागणी

संजय राऊत म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेची आहे. या प्रत्येक जागेवर यापूर्वी शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व जागा लढण्याची तयारी आहे."

"शिवसेनेने आत्तापर्यत खूप लोकांच्या पालख्या वाहिल्या आता स्वतःसाठी लढायचं आहे. काँग्रेसचा आमदार करण्यासाठी कसब्यात शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली, बारामतीत सुप्रिया सुळे यांना खासदार करण्यासाठी तुफान कष्ट केले. पण, आता शिवसैनिकांनी स्वतःकडे पहिले पाहिजे. आता पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरे असले पाहिजेत," असं आवाहन संजय राऊतांनी केलं.

"लोकसभेत अपेक्षित यश आपल्याला मिळालं नाही. मात्र, विधानसभेची लढाई त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. आपण राहण्यासाठी छातीचा कोट करून लढावं लागेल. राज्यात अनेक ठिकाणी आपण गाफिल राहिलो, नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेतून गेलेच होते," असं राऊतांनी ठणकावून सांगितलं.

sanjay raut
Bhaskar Jadhav : 'टरबुज्या..अनाजीपंत...'; फडणवीसांवर हल्लाबोल करताना भास्कर जाधवांना भानच राहिलं नाही

"आपण विधानसभेच्या 288 उमेदवार उभे केले, तर 160 जागा निवडून येतील. मात्र, आपण हा महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तरी देखील महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडेच राहिला हवं. यासाठी आपण जास्तीत जास्त आमदार निवडून द्यायचे आहेत," असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com