Uddhav Thackeray announcing new youth leadership in Kolhapur to strengthen Shiv Sena’s local political strategy. Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray Decision : पुणे जिल्ह्यात ठाकरेंची मोठी खेळी! निवडणुका होताच संघटनात्मक 'सर्जरी'; आमदाराच्या मतदारसंघाला थेट 'जिल्हाप्रमुख' पद तर शिरूरसाठी...

Pune political restructuring after elections : शिरूरसाठी ठाकरेंचा मोठा मास्टर प्लॅन तयार. निवडणुका संपल्यानंतर पुण्यात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता, जिल्हाप्रमुख पदावर विशेष लक्ष.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम नुकताच पार पडला आहे. या निवडणुकीतील यशापयश आणि बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यात मोठी संघटनात्मक 'सर्जरी' केली आहे.

खेड-आळंदी मतदारसंघातून पक्षाचा आमदार निवडून आल्यानंतर, आता त्याच भागातील नेतृत्वाला जिल्हाप्रमुख पदाचे 'गिफ्ट' देऊन आगामी काळासाठी नवी रणनीती आखली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नवीन नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे.

विजयाचा गुलाल अन् जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी

पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात बाबाजी काळे यांच्या रूपाने मोठा विजय मिळवला होता. अख्या पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार या ठिकाणी ठाकरे सेनेचा निवडून आला. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर याच भागामध्ये ठाकरे सेनेला चांगले यश मिळाल्याचे देखील पाहायला मिळाले.

आता या विजयाची पावती म्हणून खेड-आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुख पदी रामदास धनवटे यांची वर्णी लावण्यात आली आहे. आपल्या आमदाराच्या मतदारसंघात संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्यासाठीच धनवटे यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर जाहीर झालेली नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:

  • जिल्हा प्रमुख: रामदास धनवटे (खेड-आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघ)

  • सहसंपर्कप्रमुख: सुरेश भोर (खेड-आळंदी, शिरूर विधानसभा)

  • सहसंपर्कप्रमुख: दिलीप बाम्हणे (जुन्नर, आंबेगाव विधानसभा)

  • सहसंपर्कप्रमुख: केसरीनाथ पाटील (चिंचवड, भोसरी विधानसभा)

  • विधानसभा प्रमुख: आनंद रासकर (जुन्नर विधानसभा)

  • तालुकाप्रमुख:भास्कर घाडगे (जुन्नर तालुका)

दरम्यान नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या भागात पक्षाला ताकद मिळाली, तिथे ती टिकवून ठेवणे आणि जिथे कामगिरी सुधारण्याची गरज आहे, तिथे नवीन चेहऱ्यांना संधी देणे, असा दुहेरी उद्देश या नियुक्त्यांमध्ये दिसतो. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, जुन्नरमध्येही आनंद रासकर आणि भास्कर घाडगे यांच्या माध्यमातून नवीन फळी सज्ज करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT