Pune Political News Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray: थांबा, उद्धवसाहेब तुमची आठवण काढत आहेत! राऊतांकडून नाराज माजी आमदाराला निरोप

Vinayak Raut Latest Update: ठाकरे सेनेला पक्षाला रामराम करणाऱ्या नाराज नेत्यांना थोपवण्याचं काम विनायक राऊत यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ऑपरेशन टायगर लॉन्च केले आहे. या ऑपरेशन टायगर च्या माध्यमातून ठाकरे सेनेचे नाराज नेते आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या सेनेकडून करण्यात येत आहे. मात्र आता हे ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेने देखील कंबर कसली असल्याचं दिसते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन टायगरची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. उदय सामंत यांच्या माध्यमातून ठाकरेंच्या पक्षातील नाराज नेत्यांना संपर्क करण्यात येत आहे.

शिंदेंच्या सेनेकडून कोकणातील उदय सामंत मैदानात उतरले असताना विरोधात ठाकरेंनी देखील आपला कोकणातील हुकमी एक्का बाहेर काढला आहे. ठाकरे सेनेला पक्षाला रामराम करणाऱ्या नाराज नेत्यांना थोपवण्याचं काम माजी खासदार विनायक राऊत यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून पुण्यातील ठाकरेंच्या सेनेला गळती लागली असल्याचे पहिला मिळत आहे. ठाकरे सेनेत असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणखीन दोन ठाकरेंच्या गटामध्ये असलेले माजी आमदार शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. माजी आमदार महादेव बाबर देखील लवकरच पक्षाला रामराम करून देऊन शिंदे यांच्या सेनेमध्ये पक्ष प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

अशातच मागील आठवड्यामध्ये विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना संपर्क केला आहे. या संपर्कादरम्यान बाबर यांना पक्षाचे काम सुरू ठेवण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात आले असून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कामाला लागा अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाऊ नका, अशी गळ घालण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमची आठवण काढत असून त्यांनी भेटीला बोलावलं असल्याचा निरोप देखील विनायक राऊत यांनी बाबर यांना दिला असल्याचं सांगितलं जात आहे. आता मिशन टायगर रोखण्यासाठी ठाकरेंनी देखील विनायक राऊतांच्या नेतृत्वात मिशन सुरू केलं असल्याचं आता समोर आले आहे. त्यामुळे याबाबतीत कोकणातला कोणता नेता वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT