Vasant More, Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

ShivSena UBT : पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेसेनेच्या हालचाली, उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर

Uddhav Thackeray Pune Visit : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेच्या फ्लॉप परफॉर्मन्सनंतर पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

Sudesh Mitkar

Pune News, 01 Feb : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ देत नसल्याच्या आरोप त्यांच्यावर सातत्याने करण्यात येतो. हाच आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी बंड करत गुवाहाटी गाठली होती.

त्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे घरात बसून पक्ष चालवतात अशी टीका करतात. तसेच मुख्यमंत्री असतानाही ठाकरे हे घरातूनच ऑनलाईन पद्धतीने बैठका घेऊन सरकार चालवायचे पक्षातील मंत्र्यांना आमदारांना ते भेटही द्यायची नाहीत, अशी टीका त्यांच्यावर केली जाते.

मात्र, आता उद्धव ठाकरे हे पुण्यातील (Pune) सर्व शाखाप्रमुखांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या फ्लॉप परफॉर्मन्सनंतर पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर ठाकरेंची साथ सोडत 300 ते 400 शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर हडपसरमधील माजी आमदार महादेव बाबर देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेतील अन्य पदाधिकारी देखील प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. महादेव बाबर यांच्यासोबतच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. अशा प्रकारे ठाकरेसेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत.

अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शहरातील शाखाप्रमुख यांना भेटणार असल्याचे समोर आलं आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ठाकरेसाहेब लवकरच शहरातील शाखाप्रमुखांना भेटतील असं या दोघांनी जाहीर केलं आहे.

पक्षाची पडझड होत असताना शाखाप्रमुखांना भेटून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही पडझड रोखण्यासाठी ही बैठक होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नेमके शाखाप्रमुखांना कधी भेटणार? कोणत्या प्रकारचा संदेश देणार आणि यामुळे त्यांच्या पक्षाची होणारी पडझड थांबणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT