Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray: भाजपवाले 'सकाळचा भोंगा' म्हणतात; पण ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितलं,राऊतांची प्रेस कॉन्फरन्स अन् फडणवीसांचं 'कनेक्शन'

Uddhav Thackeray On PM Narendra Modi : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी शत्रू मानत नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. मात्र, ते मला शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस सध्या हतबल झाले आहेत..,असंही ठाकरे म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यात राजकीय संस्कृतीचं अधिपतन होत चालला असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. राजकीय नेते कोणतही तारतम्य न बाळगता एकमेकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून रोज सकाळी घेण्यात येणारी प्रेस कॉन्फरन्स हा चर्चेचा मुद्दा ठरतो.

सकाळी सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) हे आक्रमकपणे सत्ताधारी पक्षावर टीका करतात आणि त्यानंतर त्यांच्या टिकेला सत्ताधारी पक्षांकडून देखील त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येतं. भाजपकडून संजय राऊत यांचा सकाळ सकाळी भोंगा वाचतो अशी देखील टीका करण्यात येते.तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय संस्कृती बिघडत चालला असल्याचे देखील आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतात.

अशाप्रकारचे आरोप सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खासदार संजय राऊत यांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सबाबत काय वाटतं, असं पुण्यातील वार्तालाप कार्यक्रमांमध्ये विचारला असता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, संजय राऊत जे सकाळी बोलतात, ते जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐकतील आणि तसं वागतील तर त्यांना मदत होईल. फडणवीस यांना त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी संजय राऊत हे सकाळी जे बोलतात त्याचा मदत होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी शत्रू मानत नाही, कारण ती माझी संस्कृती नाही. मात्र, ते मला शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस सध्या हतबल झाले आहेत. इतक्या वर्षानंतर एवढं पाशवी बहुमत असलेल्या सरकार आलं आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांना केंद्रातील सरकारचा देखील पाठबळ त्यांना आहे. एवढं पाठबळ असणारा मुख्यमंत्री हतबलतेने का? वागत आहे हेच मला कळत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्या राज्यात खुलेआम भ्रष्टाचार चालू आहे. मागील अधिवेशनामध्ये काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणा आम्ही समोर आणली पुरावे देखील दिले तरी देखील मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती कशी सुधरेल असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, ज्यांच्या घरामध्ये पैशाच्या बॅगा दिसत आहेत, त्यांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बाहेर काढत नाहीत. ज्यांच्या नावावर डान्सबार आहेत. ते देखील मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे हे मुख्यमंत्री महाराष्ट्राची संस्कृती कशी सुधारणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT