Chandrakant Patil Statement: सुषमा अंधारेंचं नाव घेत चंद्रकांतदादांनी कपाळावर हात मारत कानही धरले

Chandrakant Patil Political News: आता उद्धव ठाकरे आपल्यासोबत असायला पाहिजेत असं म्हणण्याचा काहीच प्रश्न नाही. 2014 ते 2019 खूप सन्मान दिला. मात्र, तरी देखील आमच्या नेत्यांवरती खालच्या भाषेत टीका केली. केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात.
Chandrakant Patil On Sushma Andhare .jpg
Chandrakant Patil On Sushma Andhare .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhpur News: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हातांचे ठसे प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारेंचे नाव घेत थेट कपाळावरच हात मारला. मी गिरणी कामगारांचा मुलगा आहे. या संदर्भात मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र, ज्या प्रतिक्रिया येत आहेत ऐकण्यासारख्या नाहीत. पूर्वी यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?, आता शिवसेनेकडे अंधारेबाई आहेत, असे सांगत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या कपाळावरच हात मारला.

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, त्या अंधारेबाई नाही. तर अंधारेताई आहेत... त्या बाळासाहेबांबद्दल काय म्हणाल्या, हेही याचाही विचार केला पाहिजे, असा टोला लगावला. भुदरगड तालुक्यात झालेल्या विजय संकल्प मेळाव्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टातील सगळ्या याचिका संपल्या आहेत. कोर्टाने आता निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आणि सर्व पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे. जिल्हा परिषद झाल्यानंतर लगेच महानगरपालिकेची तयारी तयारी आम्ही करणार आहोत. असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्यासोबत असायला पाहिजेत असं म्हणण्याचा काहीच प्रश्न नाही. 2014 ते 2019 खूप सन्मान दिला. मात्र, तरी देखील आमच्या नेत्यांवरती खालच्या भाषेत टीका केली. केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात. असेही पाटील यांनी स्पष्ट करत सांगलीमध्ये शरद लाड यांचा पक्षप्रवेश मंगळवारी होणार आहे.

Chandrakant Patil On Sushma Andhare .jpg
Voter Scam : एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची 'मतचोरी' कशी केली? ठाकरेंच्या शिलेदारानं फोडला बॉम्ब!

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात मंगळवारी मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. शरद लाड यांनी पदवीधरच्या उमेदवारीवर क्लेम केला आहे. वडील विद्यमान आमदार असल्यामुळे आणि जास्तीत जास्त मतदान नोंदणी असल्याने त्यांनी उमेदवारीवर क्लेम केला आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रवेश करणाऱ्या कोल्हापुरातील नेत्याचे नाव समोर येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत उत्सुकता वाढवली.

Chandrakant Patil On Sushma Andhare .jpg
Sanjay Raut : पुण्यात टोळी प्रमुखांनी 3 सुभेदार नेमलेत; राऊतांनी मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांच्या खास माणसांची नावेच सांगितली

मी कोल्हापुरातून कधीच लक्ष काढून घेतलं नव्हतं. मला पक्ष जी जबाबदारी देतो,ती मी पार पाडत असतो. पश्चिम महाराष्ट्रावर मला लक्ष केंद्रित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com