Uddhav Thackeray sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray News: सोशल मीडियावरचा वाद विकोपाला, 20 नोव्हेंबरला रस्त्यावरच राडा; अखेर ठाकरेंचा पुण्यातील महिला नेत्याला दणका

Shivsena News: पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी तुफान राडा झाल्याचं समोर आलं होतं. रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. ही मारहाण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षा आरती मारणे यांच्याकडून झाल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला होता.

Deepak Kulkarni

Pune News: माजी मुख्यमंत्री व शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून खूप वर्षांनी पुण्यात एखाद्या महिला नेत्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नेत्या रेखा कोंडे यांची पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत थेट हकालपट्टी केली आहे. कोंडे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी शहराध्यक्षा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बुधवारी(ता.25) रेखा कोंडे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात 20 नोव्हेंबर 2026 रोजी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर वाद होऊन त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

रेखा कोंडे यांनी सोशल मीडियावर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मांडलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. हा इतका वाद विकोपाला गेल्याचं दिसून आलं होतं.

याप्रकरणी कोंडे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षानेही त्यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत हकालपट्टीसारखी मोठी कारवाई केली आहे. यामुळे पुणे शिवसेनेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

तसेच पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभावेळी तुफान राडा झाल्याचं समोर आलं होतं. यावेळी रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. ही मारहाण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षा आरती मारणे यांच्याकडून झाल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT