Umesh Patil Sarkarnama
पुणे

Umesh Patil : अजितदादांनी सुनावलं, काकडेंशी पंगा; आता पार्थ पवारांनी उमेश पाटलांना दिली मोठी जबाबदारी!

Umesh Patil NCP National Chief Spokesperson Sunetra Pawar and Parth Pawar assign him key role after years political differences and party-level conflicts : अजित पवारांशी मतभेद, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे प्रयत्न आणि पक्षांतर्गत संघर्षानंतर उमेश पाटील यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती; सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी दाखवला विश्वास.

Pradeep Pendhare

Ajit Pawar NCP : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेचे निकाल हाती येत असतानाच, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पदवीधर मतदारसंघात बाजी मारली असतानाच, अजित पवार राष्ट्रवादीत संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचाली घडल्या. अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांनी संघटनात्मक पातळीवर दोन मोठे निर्णय घेत, अजित पवार राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांची मुंबईच्या शहराध्यक्षपदी, तर राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर केली.

उमेश पाटील यांची ही नियुक्ती म्हणजे, पक्षात त्यांचे वाढलेले राजकीय वजन म्हणून पाहिले जात आहे. उमेश पाटील यांच्या या नियुक्तीबरोबरच पक्षांतर्गत त्यांनी केलेल्या संघर्षाला उजाळा मिळला आहे. युवा नेते खासदार पार्थ पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटली तेव्हा, उमेश पाटील यांची धरसोड वृत्ती पाहायला मिळाली होती. परंतु पुढे त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ दिली. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक राजकीय गणिते आणि उमेदवारीवरून, अजितदादांशी त्यांचे मतभेद झाले. अजित पवार राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देत, शरद पवार राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयावर पोहोचले होते.

उमेश पाटील (Umesh Patil) यांना मात्र, शरद पवार राष्ट्रवादीकडून सोलापूरमधील स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून देखील पक्ष प्रवेशांचे निमंत्रण होते. पण शरद पवार राष्ट्रवादीकडून झालेल्या तीव्र विरोधातून उमेश पाटील संधी मिळाली नाही. यानंतर पुन्हा अजित पवार राष्ट्रवादीत घरवापसी केली. अजितदादांनी देखील मोठ्या मनाने जुना कार्यकर्ता म्हणून संधी देत, सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदावर संधी दिली.

सोलापुरातील नेते राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीवर उमेश पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यावरून अजित पवार यांनी मोहोळच्या दौऱ्यात उमेश पाटील यांना कडक शब्दांत सुनावले होते.

आमदार काकडेंशी घेतला होता पंगा

विधान परिषद आमदार विक्रम काकडे पैशांच्या जोरावर आमदार झाल्याचा आरोप उमेश पाटलांनी केला होता. तशी चर्चा पक्षात रंगली होती. आमदार विक्रम काकडे यांनी यावर संताप व्यक्त करत, उमेश पाटलांना उघडपणे, "पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा माणूस महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे, माझ्या नादाला लागू नका," असा इशारा दिला होता.

पवार कुटुंबासमवेत कायम उभे...

अजितदादांच्या निधनानंतर पक्षात आणि पवार कुटुंबात अनेक बदल झाले. यात उमेश पाटील हे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत कायम उभे राहिले. काम करत राहिले. याचवेळी उमेश पाटील यांनी, पक्षातील काही नेत्यांकडून कुटुंबाला टार्गेट केले जात असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली.

पक्षांतर्गत मोठा संघर्ष, मोठी जबाबदारी!

यावरून उमेश पाटील यांचा पक्षांतर्गत संघर्ष मोठा दिसतो आहे. अजित पवार यांच्यापासून ते राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत त्यांनी पंगा घेतला दिसतो आहे. पण पक्षाचे नेते खासदार पार्थ पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत, पक्षात मोठी जबाबदारी दिली. उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी' नियुक्ती दिली. देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र स्वीकारले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT