Sangram Jagtap court notice : ‘हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करा’ या कथित आवाहनावरून राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांना नोटीस

Akola court issues notice NCP MLA Sangram Jagtap over criminal complaint concerning alleged remarks on Hindu-only shopping and religious tensions : दिवाळीत केवळ हिंदू दुकानदारांकडून खरेदी करण्याच्या कथित आवाहनासह अन्य विधानांवरून अकोला न्यायालयात फौजदारी तक्रार; 27 नोव्हेंबरला पुढील सुनावणी.
Sangram Jagtap
Sangram JagtapSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangram Jagtap Hindu shopkeepers statement : अजित पवार राष्ट्रवादीचे अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांना अकोला न्यायालयाने फौजदारी तक्रारीत नोटीस बजावली आहे. अकोल्यातील समाजसेवक आणि कच्छी मेमन बिरादरीचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी आमदार जगतापांविरोधात न्यायालयात धार्मिक भावना आणि सामाजिक तणाव निर्माण केल्याची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवर सुनावणीत होत, न्यायालयाने आमदार जगताप यांना नोटीस काढण्याचा आदेश बजावला आहे. पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे.

गेल्यावर्षी 10 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापूर येथे आयोजित हिंदू आक्रोश मोर्चाच्या सभेत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एका विशिष्ट धर्मीय समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवणारे आणि समाजामध्ये सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे बेजबाबदार विधान केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे समाजातील एका मोठ्या घटकाच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारदार जावेद जकरिया यांनी म्हटले आहे.

तक्रारदार जावेद जकरिया यांनी आमदार जगताप यांनी दिवाळीच्या काळात हिंदूंनी (Hindu) केवळ हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करावी, जेणेकरून नफा हिंदूंनाच मिळेल, असे कथित आवाहन करणारे विधान होते, असे तक्रारीत म्हटले आहे. जबाबदार लोकप्रतिनिधी समाजात वावरताना बेजबाबदार विधान करून, समाजातील एका मोठ्या घटकाच्या भावना दुखावत आहे, असे तक्रारदार जावेद जकरिया यांचे म्हणणे आहे.

Sangram Jagtap
500 Crore Audio Clip : 500 कोटीचे कथित ऑडिओ क्लिप प्रकरण; काय आहे राजकीय अंदाज? संजय गायकवाड म्हणाले, 'फालतू विषय...'

या तक्रारीत आणखी एका कथित विधानाचाही संदर्भ जावेद जकरिया यांनी दिला आहे. सभेत आमदार जगताप यांनी, “हिंदू आणि मंदिरांवर होणारे हल्ले मशिदींमधून होतात,” असे गंभीर विधान केल्याचा दावा केला आहे. या विधानातून देखील धार्मिक भावना दुखावण्याची तसेच विविध धार्मिक समुदायांमध्ये वैमनस्य वाढण्याची शक्यता असल्याचे जावेद जकरिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Sangram Jagtap
Raghuram Rajan on Rupee Fall : रुपयाच्या घसरणीवर रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला; RBI ला दिला महत्त्वाचा इशारा!

जावेद जकरिया यांनी सुरवातील 11 ऑक्टोबर 2025ला अकोला येथील अकोला येथील रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु तक्रारीवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेत खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत पुढे गेले. तक्रारीतील मुद्द्यांवर आणि कथित वक्तव्यांच्या कायदेशीर जबाबदारीवर कारवाई करण्याची मागणी करत तक्रारदाराच्यावतीने फौजदारी वकील नजीब शेख यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अंतिम युक्तिवादानंतरही आदेश लांबणीवर

या प्रकरणात न्यायालयीन लढाईत, तक्रारदाराच्यावतीने अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा होती. 23 जुलैला आदेश होण्याची शक्यता असतानाच, प्रकरण दुसऱ्या न्यायालयात वर्ग झाले. त्यानंतर नव्या न्यायालयीन प्रक्रियेनुसार सुनावणी पुढे सुरू झाली. आता 27 ऑक्टोबरला आमदार संग्राम जगताप यांना नोटीस जारी करण्याचा आदेश न्यायालयाने काढला आहे.

27 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष

न्यायालयाच्या या आदेशानंतर आता 27 नोव्हेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार संग्राम जगताप यांची वैयक्तिक उपस्थिती आवश्यक आहे की नाही, हे न्यायालयाच्या आदेशावर आणि लागू कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com