University Chowk Bridge: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील अर्थात आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या महत्वाच्या टप्प्याच काम पूर्ण झालं आहे. त्यामुळं चौकात दररोज होणारी वाहतुक कोंडी फुटणार आहे. उद्या रविवारी, ८ मार्चला महिलादिनी शिवाजीनगर ते बाणेर दुहेरी मार्गिका सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकार्पण होणार आहे, पीएमआरडीएनं याची घोषणा केली आहे.
पीएमआरडीएनं ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात म्हटलं की, "पुणेकरांचं बहुप्रतिक्षित स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे उभारण्यात आलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील 'डबल डेकर उड्डाणपूल' उद्या रविवार, दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, हा प्रकल्प पुणे महानगरातील वाहतुकीला नवा वेग देणारा ठरणार आहे.
मेट्रो मार्गिका आणि वाहनांसाठी उड्डाणपूल एकाच खांबावर उभारण्यात आलेल्या या अभिनव प्रकल्पामुळं औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. पुणे महानगराच्या वाहतुकीला नवा आयाम देणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी औंधकडून शिवाजीनगरकडं जाणारी या उड्डाणपुलाची मार्गिका सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या ८ मार्चला शिवाजीनगरकडून बाणेरकडं जाणारी आणि बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारी दुहेरी मार्गिका सुरु होत आहे. त्यानंतर काही दिवसांतच शिवाजीनगरकडून पाषाणकडं जाणारी मार्गिका देखील सुरु होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.