Status of Fugitive Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा बनावट फोन करून नांदेड सिटी पोलिसांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बक्षीस मिळविण्याच्या हेतूने हा खोटा कॉल केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
संतोष दत्तात्रय गायकवाड (वय 33, रा. किरकटवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड याने पोलिसांच्या 112 आपत्कालीन क्रमांकावर फोन करून "आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडले आहे. त्याच्याकडे दोन पिस्तूल आहेत आणि आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे," असे खोटे सांगितले.
फोन आल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांची टीम दिलेल्या ठिकाणी रवाना झाली. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर काहीच संशयास्पद निदर्शनास न आल्याने तपास सुरु करण्यात आला. त्या क्रमाने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, तो किरकटवाडी येथील पानशेत रस्त्यावर असलेल्या 'स्वागत हॉटेल' परिसरात आढळून आला.
चौकशीत त्याने खोटा कॉल केल्याचे कबूल केले. पोलिसांनी सांगितले की, त्याला वाटले की फरार आरोपीबद्दल माहिती दिल्यास पोलिसांकडून त्याला बक्षीस मिळेल, या उद्देशाने त्याने हे कृत्य केले. संतोष गायकवाड याच्यावर IPC कलम 182 (सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्याला खोटी माहिती देणे), 211 (खोटे आरोप करणे), व 505 (अ) (भय किंवा अफवा निर्माण करणारे वक्तव्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे खोट्या माहितीने पोलिस यंत्रणेला गोंधळात टाकणे हा गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या शोधासाठी पोलिस तपास अजूनही सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.