
वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा व्हिडिओ समोर आला आहे. वैष्णवीच्या आई-वडीलांनी गणेशोत्सव काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये वैष्णवीच्या नवरा शंशाक हगवणे याला अधिकमासात अंगठी भेट दिल्याचे दिसत आहे. कस्पटे कुटुंबियांनी हगवणे कुंटुबियांना अनेक वस्तूसह कपडे भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील न्यायालयात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, नणंद करिश्मा, दीर सुशील यांना अटक केली आहे. पाचही जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.
बुधवारी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी या प्रकरणात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असा गंभीर दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे. त्यानंतर या वकिलाच्या कानशिलात मारा, त्याचा मी सत्कार करेन, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केले आहे.
वैष्णवीची प्रवृत्ती ही सुसाईड करण्याची होती, तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट उघडे पडले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचे विषारी औषधे खाऊन आणि आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
सूसगाव येथे वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजीप्रेमविवाह झाला होता. या विवाहाला तिच्या घरच्यांच्या विरोध होता.
प्रेमविवाह असून देखील वैष्णवीला लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. फॉर्च्यूनर गाडीही दिली होती.
लग्नामध्ये चांदीची भांडी, लग्नानंतर चांदीच्या गौरी मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल, घड्याळे असे मागणीनुसार वारंवार पैसे हगवणे कुटुंबियांनी त्यांनी दिले होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.