Pune News 21 Jan 2025 : खंडणीच्या गुन्हामध्ये सीआयडीच्या कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाची सीआयडीने (cid) सोमवारी चौकशी केली. बीड येथे बोलून भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या दत्ता खाडे यांची तीन ते चार चौक तास चौकशी करण्यात आली.
खंडणीच्या माध्यमातून जमवण्यात आलेल्या पैशातून वाल्मिक कराड याने अनेक ठिकाणी संपत्ती घेतल्या असल्याचा संशय सीआयडीला आहे. वाल्मीक कराड याच्याशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या नावावर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड येथील इमारतीमध्ये दोन ऑफिसेस घेण्यात आले आहेत. या ऑफिसच्या खरेदीमध्ये खाडे यांनी मध्यस्थी केली असल्याचं बोललं जाते.
याबाबत आता खाडे माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. खाडे म्हणाले, "सीआयडीने वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून माझी चौकशी केली. सीआयडीने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिली असून त्यांना तपासात सहकार्य केले आहे,"
मी दहा वर्षात वाल्मिक कराडला फोनही केला नाही अथवा आमची भेट ही झाली नाही. वाल्मिक कराडचा नंबर माझ्याकडे नाही. महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्याच्या उद्देशातून हा प्रकार घडला असल्याचा आरोप खाडे यांनी केला.
ज्या फर्ग्युसन रोडवरील प्रॉपर्टी संदर्भात माझी चौकशी करण्यात आली. त्या फर्ग्युसन रोडवरील व्यवहारात माझा काही संबंध नाही. मी याबाबत सर्व माहिती सीआयडीला दिलेली आहे, असे ते म्हणाले.
मी गोपीनाथ गडाला दर्शनासाठी जात असतो, मात्र मी कधीही वाल्मिक कराडला भेटलो नाही. तरी देखील मी आणि वाल्मिक कराड एकाच जातीचे असल्याने मला यात ओढलं जात आहे, असा आरोप खाडे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.